धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ५ जून रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम धरणगाव येथे राबविण्यात येणार आहे.
या प्रसंगी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष ॲड. संजयभाऊ महाजन आणि भारतीय जनता पार्टी, धरणगाव तालुका यांच्या वतीने मोतीचुर लाडूंची तुला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिनांक ४ जून २०२५ रोजी, बुधवार संध्याकाळी ५:३० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ, धरणगाव येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमामध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच धरणगाव तालुक्यातील सर्व नागरिक बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक ॲड. संजय छगन महाजन (जिल्हाउपाध्यक्ष, भाजपा) यांनी केले आहे.