जयपूर (वृत्तसंस्था) देशात ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. आधी कर्नाटक नंतर महाराष्ट्र त्या पाठोपाठ दिल्ली आणि पिंपरी-चिंचवड पाठोपाठ जयपूरमध्ये देखील ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जयपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका कुटुंबामुळे ९ जण कोरोनाबाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे.
काल डोंबिवलीतील एक रुग्ण कोरोनाबाधित सापडला होता. परंतू आज पिंपरी चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील सहा आणि पुण्यातील एक असे सात रुग्ण एकाच दिवशी सापडले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील एकूण रुग्णांचा आकडा आठवर गेला आहे. तर राजस्थानमध्ये एकाच कुटुंबातील ९ जण सापडल्याने देशातील एकूण रुग्णांचा आकडा २१ झाला आहे.
राजस्थानच्या जयपूरमध्ये ओमायक्रॉनचे ९ रुग्ण सापडले. एक दाम्पत्य दोन मुलांसह दक्षिण ऑफ्रिकेतून जयपूरच्या आदर्श नगरमध्ये आले होते. त्यांना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची बाधा झाली होती. त्यांच्यामुळे कुटुंबातील जयपूरमध्ये राहणाऱ्या अन्य पाच जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. हे दाम्पत्य २५ नोव्हेंबरला भारतात आले होते.