मुंबई (वृत्तसंस्था) काही जणांचे संध्याकाळी सात नंतर हात थरथरायला लागतात, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांची खिल्ली उडवत अनुभवलेला एक किस्सा सांगितला.
आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटील यांचा एक किस्सा सांगितला. त्यादिवशी माझ्या गाडीत बसायला गुलाबराव पाटील घाबरले. गाडीत बसल्यावर हात थरथरायला लागले. कशाला घाबरताय गुलाबराव असं मी विचारलं, त्यानंतर मला एका कार्यकर्त्यांनं सांगितलं की ७ वाजल्यानंतर त्यांची थरथरायची वेळी सुरु होते, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटील यांची खिल्ली उडवली. याच कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी बंडखोरांनी राजीनामा द्यावा. तसेच त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असेही सांगितले.
एकनाथ शिंदेच्या बंडात ४०-५० आमदार असले तरी आमच्या संपर्कात १५ ते २० आमदार आहेत, ते आम्हाला तिथून घेऊन जाण्यास सांगत आहेत. बंडखोरांना जर पराभूत नाही केलं तर माझं नाव आदित्य ठाकरे लावणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आम्ही ज्यांना मंत्रिपदावर बसवलं, ते निर्लज्जपणे वागले, अशी टीका त्यांनी केली. बाकीचे असं म्हणायचं आम्ही बाप नाही बदलणार,काही बंडखोरांनी आयपीएल सारखा आपला लिलाव केला, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी बंडखोरांवर टीका केली