सातारा (वृत्तसंस्था) साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर आमदार शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी दगडफेक केली. या प्रकरणी शशिकांत शिंदे यांनी माफी मागितली आहे. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे हे शरद पवार यांना माहिती आहे. एकनिष्ठ आहे, मी त्यांच्यासाठी जीव देईन, फक्त माझी एकच भूमिका असेल कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊ नये, असं शिंदे म्हणाले.
शशिकांत शिंदे यांनी म्हटले की, मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करेन, ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभं केलं, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका, ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो, शरद पवार, अजितदादा, सुप्रिया ताई यांची माफी मागतो, भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे हे शरद पवार यांना माहिती आहे. एकनिष्ठ आहे, मी त्यांच्यासाठी जीव देईन, फक्त माझी एकच भूमिका असेल कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊ नये. मी एका मताने पराभूत झालो, तो स्वीकारतो, माझ्यासाठी पवारसाहेब, अजितदादा यांनी प्रयत्न केलं. माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असं शशिकांत शिंदे म्हणाले.