पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावातील अहिर-निकम नाभिक समाज बांधवांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी पंच मंडळातील सदस्यांनी समाज मंगल कार्यालयासाठी निधीची मागणी केली. गुलाबभाऊंनी तात्काळ समाज बांधवांची मागणी मान्य करत तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
पाळधी येथील निवासस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची धरणगावातील अहिर-निकम नाभिक समाज बांधवांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पंच मंडळातील सदस्यांनी समाजाच्या मंगल कार्यालयासाठी निधीची मागणी केली. यावेळी ना. पाटील यांनी सर्वोतोपरी मदत करण्यासह निधी देण्याचेही मान्य केले. यावेळी अहिर-निकम नाभिक समाज मंडळाचे महेश निकम, महेंद्र निकम, रवींद्र निकम, मनोहर निकम, देविदास निकम, अमोल निकम, अजय निकम, विक्की निकम, अनिल निकम, डीगंबर निकम यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.