TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

"भोले सरकार" भक्त परिवाराचे आगळेवेगळे आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
February 17, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव येथील “भोले सरकार राजराजेश्वर श्री सार्जेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या” वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील महाशिवरात्री निमित्त निघालेल्या पालखी मिरवणुक व शाही बारात च्या माध्यमातून गावातील शिव भक्तांना बैलगाड्यांवर १२ ज्योतिर्लिंग दर्शन यांसह महाकाली माता – भोलेनाथ – बाहुबली हनुमान, नंदीवर स्वार महादेव, राधा – कृष्ण, राम – लक्ष्मण, देव – दानव – मानव तसेच भुतों की बारात असं भव्य दिव्य आयोजन धरणगावकरांनी अनुभवलं.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील नऊ वर्षांपासून सातत्याने “भोले सरकार” भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी देखील अगदी उत्साहाने महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त स. ४.३० वा. महाभस्म आरती, स. १०.०० वाजेपासून फराळ वाटप, सायं. ५.०० वा.भव्य पालखी सोहळा व बारात मिरवणूक, रात्री सामुदायिक रूद्राष्टकम्, लिंगाष्टकम्, शिवस्तुती, कालभैरव अष्टक, नटराज स्तुती, व्दादश ज्योतिर्लिंग स्तोत्र, सामूहिक पठन, शिव तांडव नृत्य, सांस्कृतिक नाट्यकथा, भजन गायन शिवस्तुती महिला मंडळाच्या वतीने संपन्न झाले. सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक, शाही बारात व १२ ज्योतिर्लिंग दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाशिवरात्री निमित्त निघालेल्या पालखी मिरवणुक व शाही बारात च्या माध्यमातून गावातील शिव भक्तांना बैलगाड्यांवर १२ ज्योतिर्लिंग दर्शन यांसह महाकाली माता – भोलेनाथ – बाहुबली हनुमान, नंदीवर स्वार महादेव, राधा – कृष्ण, राम – लक्ष्मण, देव – दानव – मानव तसेच भुतों की बारात असं भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते. गावातील रामदेवजी बाबा नगर येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष लिलाबाई सुरेश चौधरी यांच्या हस्ते आरती संपन्न झाल्यानंतर मिरवणुकीला सुरवात झाली. सर्वात आधी वाद्याच्या तालावर थिरकणारे युवा भक्त, पाठोपाठ विविध झाँक्या, त्यानंतर बैलगाड्यांवर १२ ज्योतिर्लिंग दर्शन, महिला – पुरुष – अबालवृद्ध व सर्वात शेवटी बाबा भोलेनाथ यांची सुंदर सजावट असलेली पालखी असा क्रम लावण्यात आला होता.
भोले सरकार भक्त परिवाराचे शिस्तबद्ध नियोजन, विद्युत रोषणाई, पारंपरिक वाद्य, भोलेबाबांचा जयघोष अशी कितीतरी वैशिष्ट्ये ठळकपणे जाणवली. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्तांचा उत्साह बघून धरणगाव शहराला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या भव्यदिव्य मिरवणुकीचा मार्ग रामदेवजी बाबा नगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक – छत्रपती शिवराय स्मारक – परिहार चौक – लांडगे गल्ली – लालबहादूर शास्त्री स्मारक – कोट बाजार – तात्यासाहेब महात्मा फुले स्मारक (धरणी चौक) – डेलची – बजरंग चौक – हनुमान नगर – पारोळा नाका – सार्जेश्वर महादेव मंदिर असा होता. बारात व मिरवणुकीत उज्जैन येथून विशेष उपस्थिती देण्यासाठी आलेल्या सर्व कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करून लोकांची मने जिंकून घेतली. सार्जेश्वर महादेव मंदिराच्या पावन परिसरात मिरवणुकीच्या समारोपप्रसंगी सर्व कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या दैदीप्यमान कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले. महाशिवरात्रीच्या निमित्ताने “भोले सरकार राजराजेश्वर श्री सार्जेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या” वतीने आयोजित कार्यक्रमाला गावातील तसेच बाहेर गावातील महिला – पुरुष – युवक – अबालवृद्ध नागरिकांची प्रचंड उपस्थिती व प्रेम लाभले. गावातील कोणाकडूनही एक नया पैसा न घेता एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित करता येतो याचे उदाहरण धरणगावकरांनी अनुभले. या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या आयोजनात तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी “भोले सरकार” भक्त परिवाराच्या प्रत्येक सदस्याने घरचे कार्य समजून जबाबदारी स्वीकारून काम केले. या सर्व युवकांना गावातील जनतेचे व महादेव भक्तांचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 12 ते 18 ऑक्टोबर 2026 !

October 11, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 18 फेब्रुवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) च्या प्रसिद्धीप्रमुखपदी ईश्वर महाजन यांचे निवड

September 15, 2022

सुप्रीम कोर्टाने विनाकारण वाद उकरून काढू नये : प्रकाश आंबेडकर

May 21, 2022

Strona Oficjalna Zakłady + Kasyno Online

November 16, 2022

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group