अमळनेर (प्रतिनिधी) पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी राज्य स्तरीय संघटना ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या तालुकाध्यक्षपदी पत्रकार अजय भामरे तर सचिवपदी पत्रकार जितेंद्र पाटील यांची जिल्हा कार्याध्यक्ष डिगंबर महाले यांनी नियुक्ती केली आहे.
उर्वरित कार्यकारिणी अशी :
उपाध्यक्ष – राहुल पाटील
संघटक – सचिन चव्हाण
कोषाध्यक्ष – रवींद्र मोरे
सदस्य – ईश्वर महाजन , रमण भदाणे, विनोद कदम, शरद कुलकर्णी, रवींद्र बोरसे, भरत पाटील
सदर कार्यकारिणीला जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांनी मान्यता दिली आहे. अमळनेर येथे लवकरच संघटनेची जिल्हास्तरीय बैठक होणार आहे.















