अमळनेर (प्रतिनिधी) राज्यातील प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या ‘व्हाईस ऑफ मिडिया’ या संघटनेच्या अमळनेर तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार तालुकाध्यक्षपदी अजय भामरे यांची तर राहुल पाटील यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांनी दोघांना नियुक्ती पत्र दिले. अमळनेर तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे. अध्यक्ष अजय भामरे,उपाध्यक्ष राहुल पाटील,सचिव -जितेंद्र पाटील,संघटक – सचिन चव्हाण,कोषाध्यक्ष – रवींद्र मोरे, सदस्य – ईश्वर महाजन, रमण भदाणे, विनोद कदम, शरद कुलकर्णी, रवींद्र बोरसे, भरत पाटील. सर्व सदस्यांचे अभिनंदन जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल, जिल्हा कार्याध्यक्ष विकास भदाणे आणि डीगंबर महाले यांनी केले आहे.