धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पष्टाणे गावी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अजिंक्यक्रांती फाऊंडेशनने ग्रामीण भागातील झोपडपट्टीत राहणाच्या गरजू व होतकरू मुलामुलींना वह्या व पुस्तके वाटप केली.
यावेळी अजिंक्यक्रांती फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुपोर्णिमेच्या निमित्त घरोघरी जाऊन शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले. विद्यार्थ्यांना दररोज शाळेत पाठवत चला. जेणेकरून तो शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले. वह्या पुस्तके दिल्यानंतर लहान मुला मुलींच्या चेहऱ्यावरच हास्य फुलले होते. याप्रसंगी अजिंक्यक्रांती फाऊंडेशनचे प्रदेश संघटक विवेक जाधव, कार्यकारिणी सदस्य विशाल जाधव, उदय जाधव, लोकेश ठाकरे, दुर्गेश जाधव, निखिल पाटील, मनिष पाटील, धनंजय पाटील आदी उपस्थित होते.