जळगाव (प्रतिनिधी) संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय जिवा सेनाकडून संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
जळगाव शहरात पॉपूलर मेन्स पार्लर टॉवर चौकात संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी समाजातील मान्यवर म.ना.म.चे राज्य संपर्क प्रमुख किशोर सूर्यवंशी, म.ना.म.चे जिल्हा कार्याअध्यक्ष व माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा अध्यक्ष देविदास फुलपगारे, जनता बँकेचे गणेश कॉलनी शाखा मॅनेजर बापूसाहेब महाले, पॉप्युलर मेन्स पार्लरचे बापूसाहेब जगताप, बारा बलुतेदार शहर अध्यक्ष चंद्रशेखर जी. कापडे, अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा निरीक्षक तथा संघटक किरण नांद्रे, अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा उपाध्यक्ष राहुल जगताप, शहर संघटनेचे माजी अध्यक्ष जगदीश निकम, जिवा सेनेचे जेष्ठ सल्लागार मधुकर नाना निकम, अखिल भारतीय जिवा सेना शहर कार्याध्यक्ष विशाल कूवर, जिवा सेना शहर संपर्क प्रमुख राजू जगताप, जिवा सेना सघटक गोरख सिरसाठ, भरत बेंडाळे, संकेत कापसे, समाधान बोरसे, भूषण आंबेकर, दिनेश चित्ते, शैलेश चित्ते, अक्षय रोडे, दिनेश सोनवणे इ. समाज बांधव उपस्थित होते.