TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

ग्राहकांच्या रक्षणासाठीच महावितरणकडून दक्षता

vijay waghmare by vijay waghmare
February 20, 2026
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्याच्या क्षमतेच्या बाबतीत महावितरणने निर्बंध लादल्याचा सौरऊर्जा प्रकल्प पुरवठादारांचा आरोप चुकीचा आहे. अधिक क्षमतेची रास्त गरज असलेल्या वीज ग्राहकांना महावितरणकडून तपासणीनंतर मंजुरी देण्यात येत आहे. सामान्य घरगुती ग्राहकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेत पुरवठादारांच्या दबावामुळे ग्राहकांचे नुकसान होऊ नये, यासाठी महावितरणकडून दक्षता घेण्यात येत आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही सामान्य घरगुती ग्राहकांसाठी आहे. तथापि, नियमित घरगुती वीज पुरवठ्याच्या गरजेपेक्षा खूप जास्त क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसवायचा, केंद्र सरकारकडून अनुदान घ्यायचे, नंतर त्या कनेक्शनचे रुपांतर वाणिज्यिक कनेक्शनमध्ये करून अनुदानाचा गैरफायदा घ्यायचा, असे प्रकार घडल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले.

READ ALSO

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

महावितरणकडे अशा तक्रारी आल्या होत्या की, वीज ग्राहकांचा विजेचा वापर कमी असल्याने त्यांची एक किंवा दोन किलोवॅटच्या प्रकल्पाची गरज असताना पुरवठादारांकडून त्यांच्यावर अधिक क्षमतेचा प्रकल्प बसविण्यासाठी दबाव आणण्यात येत आहे. यामुळे गरज नसताना संबंधित घरगुती ग्राहकावर जास्त क्षमतेच्या प्रकल्पाच्या खर्चाचा बोजा पडतो. हे ध्यानात घेऊन महावितरणने ग्राहकांचा प्रत्यक्ष विजेचा वापर किती आहे हे ध्यानात घेऊन त्यानुसार स्वयंचलित व्यवस्थेत विजेच्या मंजूर भाराला (लोड) मान्यता देण्याची व्यवस्था केली. त्यानुसार त्या ग्राहकाला सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविता येतो. तथापि, ग्राहकाच्या नियमित वीज वापरापेक्षा खूप जास्त क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याची मागणी आली तर महावितरणकडून ती स्वयंचलित पद्धतीने मंजूर केली जाणार नाही तर त्यासाठी महावितरणच्या यंत्रणेकडून तपासणी करून रास्त मागणी असल्याचे स्पष्ट झाल्यावर मंजुरी देण्यात येईल.

काही प्रकरणात कुटुंबाचा विस्तार झाल्यामुळे किंवा तत्सम काही कारणाने वीज ग्राहकाला अधिक क्षमतेचा प्रकल्प बसविण्याचे गरजेचे ठरले व त्यानुसार मागणी झाली तर त्या बाबतीत महावितरणकडून प्रत्यक्ष भेटीत खात्री केली जाईल. खात्री झाल्यानंतर त्या ग्राहकांना अधिक क्षमतेचे प्रकल्प बसविण्यास परवानगी दिली जाईल. यासाठी महावितरणच्या व्यवस्थापनाने संबंधित यंत्रणेला आदेश दिले आहेत.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटच्या प्रकल्पासाठी ६० हजार रुपये तर तीन किलोवॅटच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते. प्रकल्पासाठीचा बाकीचा खर्च वीज ग्राहकाने करायचा असतो. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेतून ग्राहकाची घरगुती विजेची गरज भागेल व काही अतिरिक्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणला विकून लाभ होईल, अशी ही योजना आहे. या योजनेचा उद्देश्य महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना दिलासा देण्याचा आहे.

योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणची देशात आघाडी
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी महावितरण ही महाराष्ट्रासाठीची नोडल एजन्सी आहे. ही योजना फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू झाली. गेल्या दोन वर्षात राज्यात ४.५३ लाख वीज ग्राहकांना योजनेचा लाभ झाला असून त्यांची एकत्रित सौरऊर्जानिर्मिती क्षमता १,७२२ मेगावॅट आहे. या ग्राहकांना ३,१६२ कोटी रुपये अनुदान मिळाले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

या योजनेचा वापर करून महावितरणने संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी सौरग्राम योजना सुरू केली असून आतापर्यंत १७ गावे सौरग्राम झाली आहेत. तसेच राज्य सरकारने या योजनेत वीज ग्राहकाला मिळणाऱ्या अनुदानात स्वतःकडून भर घालून दारिद्र्य रेषेखालील अथवा गरीब अशा पाच लाख कुटुंबांना अत्यंत कमी रकमेत योजनेचा लाभ मिळवून देणारी स्मार्ट योजना सुरू केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026
जळगाव

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

April 6, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
जळगाव

वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवायचेत? मग मोबाइल नंबर अपडेट करा !

April 6, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

April 5, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 21 फेब्रुवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

छगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप !

October 1, 2022

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण !

June 4, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2025 !

September 12, 2025

पोलीस ठाण्यात स्नेहभोजनाचे आयोजन, जेवतानाच महिला हवालदाराला हृदविकाराचा झटका !

May 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group