TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवायचेत? मग मोबाइल नंबर अपडेट करा !

जळगाव परिमंडलात सोळा लाख ग्राहक घेताहेत लाभ

vijay waghmare by vijay waghmare
April 6, 2026
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : महावितरणने ग्राहकांना अनेक सेवा घरबसल्या देण्यास सुरुवात केलेली आहे. सर्व प्रकारच्या वीजसेवांची माहिती ग्राहकांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे दिली जाते. वीजबिल तसेच वीजपुरवठा बंदचा कालावधी व इतर माहिती मिळवण्यासाठी जळगाव परिमंडलातील जवळपास सोळा लाख ग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदवला आहे. नव्याने नोंदणीसाठी तसेच आधी नोंदवलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून सर्व वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

जळगाव परिमंडलातील सर्व वर्गवारीतील एकूण 17 लाख 24 हजार 508 वीजग्राहकांपैकी 15 लाख 90 हजार 711 ग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदवला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर या वर्गवारीतील 13 लाख 47 हजार 590 ग्राहकांपैकी 12 लाख 35 हजार 219 ग्राहकांचा अर्थात 91.66 टक्के ग्राहकांचा तर कृषिपंप वर्गवारीतील 3 लाख 76 हजार 918 ग्राहकांपैकी 3 लाख 55 हजार 492 ग्राहकांचा अर्थात 94.32 टक्के ग्राहकांचा समावेश आहे.

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

जळगाव मंडलात 10 लाख 37 हजार 550 वीजग्राहकांपैकी 9 लाख 75 हजार 429 ग्राहकांनी, धुळे मंडलात 4 लाख 59 हजार 344 वीजग्राहकांपैकी 4 लाख 22 हजार 174 ग्राहकांनी, तर नंदुरबार मंडलात 2 लाख 27 हजार 614 वीजग्राहकांपैकी 1 लाख 93 हजार 108 ग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदवला आहे.
या ग्राहकांना वीजबिलाची माहिती, तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी, मीटर रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख, बिल भरल्याचे कन्फर्मेशन यासह विविध सेवांची माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठवण्यात येते. परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा सर्व वर्गवारीतील 92.24 टक्के ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकांची नोंदणी झालेली आहे. असे असले तरीही ज्या ग्राहकांना आपला मोबाइल क्रमांक बदलायचा आहे, त्यांनी तसेच ज्यांना नव्याने क्रमांक नोंदवायचाय, त्यांनी 1912 किंवा 1800-212-3435 व 1800-233-3435 या 24 तास सुरू असणाऱ्या टोल फ्री क्रमांकांवर किंवा https://pro.mahadiscom.in/ConsumerInfo/consumer.jsp या संकेतस्थळावर किंवा महावितरण अ‍ॅपवर नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
जळगाव

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

July 5, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
जळगाव

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

July 4, 2026
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ संपन्न; रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

July 4, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे... रजनी सावकारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Rate Today : सोने चांदीचे भाव वधारले ; जाणून घ्या..आजचा दर !

March 2, 2022

… तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते ; शिवसेना आमदाराचं वक्तव्य

April 18, 2021

लखीमपूर हिंसाचार घटनेत आशिष मिश्रा मुख्य आरोपी ; ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

January 3, 2022

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ, राहुल गांधी म्हणाले-आणखी किती लाचार करणार देशाला!

December 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group