जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्त्या सुचित्राताई महाजन यांच्या संकल्पनेतून व खान्देश युथ ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने आज भव्य लसीकरणशिबीराचे अयोध्या नगरात आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ७ वाजेपासून परिसरातील नागरिकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. अत्यंत शिस्त बद्धपणे व शांततेत शिबीराला सुरुवात झाली. परिसरातील अयोध्या नगर, कौतिक नगर, सद्गुरू नगर, म्हाडा कॉलनी, सुप्रीम कॉलनी, M.I.D.C परिसरातील सर्व स्तरावरील नागरिकांनी लसीकरण केलं. परिसरात मजूर वर्ग जास्त असल्याने व शनिवार रविवारचा दिवस असल्याने नागरिकांनी गर्दी केली होती. अयोध्या नगर वासियांनी मदत केल्यामुळे हा कार्यक्रम अतिशय नियोजन पद्धतीने कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला स्वयंमसेवक यांची प्रमुख भूमिका होती.
यावेळी श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे दीपक दाभाडे, मी मराठी प्रतिष्ठानचे राहुल परकाळे, पप्पू जगताप खान्देश युथ ऑर्गनायझेशनचे रोहन महाजन, शुभम गीते, तेजस दुसाने, श्रेयस चौधरी, रोहित काळे, निखिल परदेशी, मोहित नेमाडे, युगल मंडोरे, संकेत वारुडकर, यश लोढा आदी उपस्थित होते. अनमोल सहकार्य म्हणून वामन महाजन, नितीन काबरा, विजय पाटील, दिपप्रभा पाटील, मनीषा पाटील, सुनीता कबरा, यामिनी पाटील यांचे सहकार्य लाभले.