TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा दुध संघ निवडणूक पुढं ढकलण्यामागे मोठं राजकारण घडलं का?

चर्चांचा बाजार गरम का? ; पुढील काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार का?

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दुध संघाची निवडणूक निवडणूक 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर निवडणूक पुढं ढकल्यामागे मोठं राजकारण घडलं का? तसेच पुढील काही दिवसात मोठ्या घडामोडी घडणार का?, या दोन मुद्द्यांवर चर्चांचा बाजार मोठ्या प्रमाणात गरम झाला आहे.

निवडणूक चिन्ह वाटप पूर्ण 
जळगाव जिल्ह्यात जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून चांगलाच राजकीय वातावरण तापले असतानाच आता या निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. राज्य शासनाने ग्रामपंचायतीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम 20 डिसेंबर पर्यंत स्थगित केला आहे. त्यामुळे जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीत मतदानाची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याबाबत आता निवडणूकीचा पुढील निर्णय 20 डिसेंबरनंतर घेण्यात येणार आहे, असे आदेश राज्य शासनाने नुकतेच काढले आहेत. जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीच्या प्रक्रियेला वेग आला होता. मंगळवारी अंतिम उमेदवारी यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

निवडणूक स्थगित करण्यामागची काही महत्त्वाची कारणे कोणती ?
जळगाव जिल्हा दूध संघाची 10 डिसेंबर रोजी होणारी निवडणूक 20 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलीय. यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. राज्यात होऊ घातलेल्या 7 हजार 751 ग्रामपंचायतच्या निवडणूक कार्यक्रमामुळे ‘अ’ आणि ‘ब’ दर्जाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या 20 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागचे सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता 20 डिसेंबरनंतर निवडणुकीची पुढील तारीख जाहीर होईल. दूध संघाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता उमेदवारांना पुढील निवडणूक तारीख जाहीर होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

काय आहेत शासनाचे आदेश?
राज्यात होऊ घातलेल्या 7 हजार 751 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये मतदारांनी निवडणुकीत सहभाग जास्तीत जास्त नोंदविण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 क मधील तरतुदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात वर्ग “क” वर्ग “ड” तसेच वर्ग “ई” प्रकारच्या सहकारी संस्था त्याचप्रमाणे ज्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक घेण्याचे प्रादेशिक केलेले आहे, अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील “अ” व “ब” वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर 20 डिसेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे, असे राज्य शासनाचे आदेश काढले आहे. या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्हा दूध संघाचा देखील समावेश आहे. आता पुढची मतदानाची प्रक्रिया ही 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार होते. राज्य शासनाच्या आदेशामुळे आता निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबरनंतर घेण्यात येणार आहे, असे आदेश विशेष कार्य अधिकारी व सहनिबंधक सहकारी संस्थेचे श्रीकृष्ण वाडेकर यांनी काढले आहे.

चर्चांचा बाजार गरम का? ; पुढील काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार का?

निवडणूक रंगात आली असतांना अचानक पुढे ढकलली गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांचा बाजार गरम झाला आहे. अगदी पुढील काही दिवसात मोठ्या घडामोडी घडणार असल्याबाबत जळगावच्या सोशल मीडियात वेगवेगळ्या गप्पा हाकल्या जात आहेत. अगदी निवडणुकीपूर्वी मोठा हायव्होल्टेज राजकीय ड्रामा घडणार असल्याची देखील चर्चा असून यातून विरोधकांना कमजोर करण्याचा उद्देश असून यासाठीच ही खेळी खेळली गेल्याचे देखील बोलले जात आहे. परंतू निवडणूक पुढे ढकलण्यामागे फक्त प्रशाकीय कारण असल्याचे तूर्त तरी समोर आले आहे. परंतू काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा काही जण करत आहेत. पण अद्याप तरी ठोस काहीही कारण समोर आलेले नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

Horoscope Today : राशीभविष्य, बुधवार ३० नोव्हेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव जिल्हा बँकेची शाखा राम भरोसे ; चार दिवसांपासून इंटरनेट सेवा विस्कळीत !

February 23, 2021

शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जात असलेल्या महिलेवर सामुहिक बलात्कार !

May 10, 2021

परभणी येथे बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे महाराष्ट्र राज्य आधिवेशन !

August 23, 2023

जिल्ह्यात आज आढळले २५ कोरोनाबाधित, ३० झाले बरे !

January 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group