
पाळधी/धरणगाव/जळगाव, (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर आणि युवानेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवत धरणगाव तालुक्यातील शामखेडा येथील असंख्य युवकांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत जाहीर प्रवेश केला. या दमदार पक्षप्रवेशामुळे शामखेडा परिसरात शिवसेनेची ताकद आणखी वाढली असून, शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.*
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नव्या शिवसैनिकांचे स्वागत करताना सांगितले की, “शिवसेना ही सर्वसामान्यांच्या सुख – दुःखात धावून जाणारी संघटना आहे. भगवा खांद्यावर घेतला म्हणजे जनसेवेची जबाबदारी स्वीकारली. गावातील गोरगरीब, शेतकरी आणि गरजूंच्या मदतीला सर्वप्रथम शिवसैनिक उभा राहिला पाहिजे. हीच खरी शिवसेनेची ओळख आहे.
यांनी बांधले शिवबंधन
शामखेडा येथील गणेश भिंगाणे, लोकेश सातपुते, किरण भिल, तुषार ढवळे, अक्षय गायकवाड, विकास भिंगाणे, आकाश भिल, मनोज सातपुते, नंदू सातपुते, प्रकाश सातपुते, घनश्याम भिल, आनंद भिल, गौतम शिंदे, अर्जुन र शिंदे, सागर भिल, साहिल भिल, राजू भिल, करण भिल, अजय भिल, मनोज शिंदे, राजू भिल, समाधान भिल, प्रल्हाद भिल, समाधान भिल व राजू भिल या युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन युवानेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले, तर आभार शिवसेना तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
यावेळी युवानेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर, शिवसेना तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, सचिन पवार, रवींद्र चव्हाण, मुकुंदराव ननवरे, दीपक भदाणे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
















