TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

vijay waghmare by vijay waghmare
July 25, 2026
in Uncategorized, जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – देशभरात शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता तसेच NEET, CET आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये कथित अनियमितता, पेपरफुटी व गैरव्यवहारांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला भुसावळमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते इलियास इकबाल मेमन यांनी उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी), भुसावळ यांना निवेदन सादर करून विद्यार्थ्यांच्या मागण्या राज्य व केंद्र शासनापर्यंत तातडीने पोहोचविण्याची मागणी केली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिक्षण हा केवळ प्रशासकीय विषय नसून देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि राष्ट्रनिर्मितीचा मूलभूत पाया आहे. त्यामुळे NEET, CET तसेच इतर स्पर्धा परीक्षांबाबत समोर आलेल्या पेपरफुटी, प्रशासकीय हलगर्जीपणा व इतर कथित अनियमिततेच्या आरोपांची स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी होणे अत्यावश्यक आहे.

READ ALSO

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

इलियास मेमन यांनी प्रशासनाकडे केलेल्या प्रमुख मागण्या

  1. NEET, CET तसेच इतर स्पर्धा परीक्षांबाबत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची उच्चस्तरीय, स्वतंत्र, निष्पक्ष व कालबद्ध चौकशी करण्यात यावी.
  2. चौकशीत पेपरफुटी, भ्रष्टाचार किंवा इतर अनियमितता सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी व दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.
  3. परीक्षा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता, उत्तरदायित्व व तांत्रिक सुरक्षितता सुनिश्चित करून भविष्यात अशा घटना होणार नाहीत यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यात यावी.
  4. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मागणीप्रमाणे केंद्रीय शिक्षण मंत्री आणि राज्य शिक्षण मंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागणीचा सक्षम शासन स्तरावर गांभीर्याने विचार करण्यात यावा.
  5. विद्यार्थी प्रतिनिधींशी तातडीने संवाद साधून त्यांच्या समस्या न्याय्य व वेळेत सोडविण्यात याव्यात.
  6. भुसावळ येथे विद्यार्थ्यांनी सादर केलेले निवेदन तात्काळ राज्य शासन व केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावे.
  7. या निवेदनावर झालेल्या कार्यवाहीची लेखी माहिती अर्जदारास देण्यात यावी.

निवेदनात भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४, १९(१)(अ), १९(१)(ब) आणि २१यांचा उल्लेख करत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे व मागण्या मांडणे हा विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करणे हे शासनाचे कर्तव्य असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.

यावेळी इलियास इकबाल मेमन यांनी सांगितले की, “लोकशाहीमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज ऐकणे, त्यांच्या भविष्याचे संरक्षण करणे आणि शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम राखणे हे शासनाचे घटनात्मक व नैतिक कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक व्हावी, हीच या निवेदनामागील भूमिका आहे.”

या निवेदनाच्या प्रती मा. जिल्हाधिकारी, जळगाव, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन तसेच मा. शिक्षण सचिव यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 25 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

July 4, 2026

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

September 28, 2020

बीएचआर घोटाळा : पंतप्रधान, राष्ट्रपतींसोबतच्या पत्रव्यवहारालाही कंडारे दाखवायचा केराची टोपली !

June 29, 2021

‘पंजाबचा CM बनेन किंवा खलिस्तानचा पहिला PM असे केजरीवाल म्हणाले’ : कुमार विश्वास यांचा खळबळजनक आरोप

February 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group