
पाळधी/जळगाव, (प्रतिनिधी) – उखळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि युवानेते, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाळधी येथील पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यामुळे उखळवाडी परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. “शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नाही, तर सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारा विचार आहे. शिवसेनेत येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान मिळेल. गावाच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकदिलाने काम करा,” असे आवाहन त्यांनी केले.
यांनी बांधले शिव बंधन
या पक्ष प्रवेशात अशोक पाटील, सोमेश्वर पाटील, प्रेमू पाटील, गणेश पाटील, शंकर पाटील, मुरलीधर पाटील, रवींद्र पाटील, प्रकाश पाटील, दीपक पाटील, जितेंद्र पाटील, दिनकर पाटील, धनराज पाटील, पवन पाटील, सचिन धनराज पाटील, गुलाब पाटील, योगेश पाटील, जितेंद्र मराठे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
युवानेतेतथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.















