भुसावळ (प्रतिनिधी) येथे डि.एल. हिंदी हायस्कूल दहावी १९९६-९७ बॅच चे स्नेह संमेलनात माजी विद्यार्थी यांनी “आठवणींचे मोरपीस” गुरुंच्या आशीर्वादाने बालदिवस साजरा केला. कार्यक्रमाच्या सुरुवात डी एल हिंदी हायस्कूलच्या सभागृहात दिपप्रज्वलन व सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे डि.एल हिंदी हायस्कूल येथे पहिल्यांदाच माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
व्यासपीठावर हिंदी सेवा या कार्यक्रमात हिंदी सेवा मंडळचे ट्रस्टी ब्रिजमोहन अग्रवाल, सत्यनारायण गोडाले, महेशदत्तजी तिवारी, मधुलता शर्मा, बिशन अग्रवाल, नगरसेवक रमेश नागराणी, पंकज कुमार संड, श्यामदरगड तसेच शिक्षकवर्ग रमेश सोनार, युवराज पाटील, मनोहर बर्हाटेे, यशवंत वारके, पुखराज शर्मा, यु एम राणे, संजय शुक्ला, प्रबोध भावे, मयूर शहा तसेच शिक्षिका सुनंदा सोनार, शोभा मंत्री, अनुसया भिरुड, भुसारे मॅडम, कुसुम सोनार, साधना रीसबुड, मृदुला हातवळणे, किरण पांडे, उपस्थित होते. उपस्थित ट्रस्टी व शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना नेमाणे आणि गणेश आंधळे यांनी केले तर प्रस्तावना प्रसन्न पांडे याने केले. विद्यार्थ्यांतर्फे मनोगत महेश कुलकर्णी, शिल्पा जाधव, आणि हरीष भट यांनी व्यक्त केले. याच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी म्हणून भारत भर विखुरलेले सर्व माजी विद्यार्थी तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र आले. अमित नाशिककर, किरण कदम, किशोर मिसाळ, संजय सोनार, हबीब चव्हाण, उमाकांत खंबायत, महेश कुलकर्णी, मनोज पाटील, स्मिता फुलझेले, शीतल वडे, रुपाली बर्गे, अपर्णा ताथोड, गजानन साठे, जितेंद्र विसपुते, निलेश खैरे, सुनील मराठे सुनील सांगळे, विनोद निकम, सुनील दुसाने, निलेश लवंगडे, शैलेंद्र मानकर, सचिन सगळे, प्रवीण नारखेडे, शिवाजी मोते, गिरीश फ़ेगडे, यासर्व माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन रींकु बागडीयाने केले. सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.