अमळनेर (प्रतिनिधी) येथील लायन्स व लायनेस क्लब ने सेवा सप्ताहानिमित्त विविध समाजाभिमुख उपक्रम राबविले. शहरा बाहेरील श्री अंबरीश टेकडी येथे लायन्स व लायनेस क्लबच्या सदस्यांनी ५१ रोपट्यांचे वृक्षारोपण केले.
दरवर्षी लायन्स परिवारातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात ते यावर्षी उपप्राचार्य डॉ.प्रकाश शिरोडे, डी.आर.कन्याशाळेचे शिक्षक विनोद पाटील(कदम),तालुक्यातील शिरूड येथील जि.प.शाळेच्या शिक्षिका सौ.दर्शना बोरसे-चौधरी यांना समारंभपूर्वक देण्यात आला.
प्रताप महाविद्यालयाच्या नाट्यगृहात झालेल्या भव्य कार्यक्रमात कोरोना निर्मूलनासाठी ज्यांनी तन-मन-धन आणि अन्नदानाच्या माध्यमातून मोठे योगदान दिले अशा वैद्यकीय व अवैद्यकीय तथा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आले. तसेच काही वंचित सेवाभावी महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.
यावेळी आमदार अनिल पाटील,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव,पोलीस निरीक्षक आंबदास मोरे,गटविकास अधिकारी संदीप वायाळ, पालिकेच्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,तालुका आरोग्य अधिकारी गिरीश गोसावी,ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताडे,पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास महाजन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
संदीप घोरपडे, सौ.दर्शना बोरसे,माजी आमदार साहेबराव पाटील,लायन्स क्लबचे प्रेसिडेंट डिगंबर महाले,आमदार अनिल पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.लायन्स क्लबचे ट्रेझरर कुमारपाल कोठारी यांनी ध्वजवंदना म्हटली,सौ. जया जैन व सौ.रुपाली सिंघवी यांनी सूत्रसंचालन केले.लायन्स क्लबचे सेक्रेटरी विनोद अग्रवाल यांनी आभार मानले.
शहरातील विविध पेट्रोल पंपांवर जाऊन लायन्स परिवाराने तेथील कर्मचारी व ग्राहकांची कोविड-१९ ची प्राथमिक तपासणी केली.सर्वांना सॅनिटायझर व मास्क दिले.डॉ.प्रशांत शिंदे,डॉ.संदीप जोशी व मिलिंद नावसरीकर यांनी तपासणीसाठी सहकार्य केले. श्री मंगळ ग्रह मंदिर येथील कर्मचारी व परिसरातील नागरिकांची मधुमेहाबाबतची मोफत तपासणी करण्यात आली.सर्वांची तपासणी व समुपदेशन डॉ.मिलिंद नवसारीकर,माजी प्रांतपाल डॉ. रवींद्र कुळकर्णी व डॉ.रवींद्र जैन यांनी केले.
या सर्व समोजोपयोगी उपक्रमांना लायन्स प्रेसिडेंट डिगंबर महाले,सेक्रेटरी विनोद अग्रवाल,ट्रेझरर कुमारपाल कोठारी, लायनेस क्लबच्या सेक्रेटरी शारदा अग्रवाल, ट्रेझरर सौ.श्वेता कोठारी,जितेंद्र जैन,प्रदीप जैन,योगेश मुंदडे, पंकज मुंदडे,प्रसन्ना पारख,अनिल रायसोनी,प्रशांत सिंघवी,दिलीप गांधी,राजू नांढा, शाम गोकलानी, नीरज अग्रवाल,अजय हिंदुजा,मनीष जोशी,येजदी भरुचा,हेमंत पवार,जयेश गुजराथी,महेंद्र पाटील,उदय शाह,जितेंद्र पारख,जितेंद्र कटारिया,प्रदीप अग्रवाल,सुरेश कुंदनानी,प्रा.नयना नवसारीकर,राजुल गांधी,डॉ.मंजुश्री जैन,सोनल जोशी,सोनाली मुंदडे,विपुला नांढा, जसमीन भरुचा,खुशाली पारख आदी उपस्थित होते.