चोपडा प्रतिनिधी – 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बालिका दिवस कार्यक्रमात प्रतिमा पूजन विद्यालयाचे व्यवस्थापक राकेश पाटील बालमोहन विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप चौधरी,तसेच सुनीता साठे सुरेखा बडगुजर वंदना पाटील अर्चना पाटील,अर्चना चौधरी, जयश्री सोनवणे,रुपाली बोरसे योगिता बाविस्कर महिला शिक्षिका यांनी केले. प्रसंगी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. विद्यार्थीनी यांनी सावत्रीबाई फुले यांची वेशभूषा केलेली होती.त्यांनी असे विचार आपल्या परखड वक्तृत्व द्वारे व्यक्त केले यांनी सावित्रीबाई यांच्या कार्याचा परिचय करून देताना मुलींच्या शिक्षणासाठी , समाजातील बालविवाह रोखण्यासाठी, विधवा पुनर्विवाह सतीची प्रथा या अनिष्ट रूढी परंपरा यांना मोडीत काढून महिलांना कसा न्याय मिळवून दिला.याबाबत सविस्तर माहिती दिली. मुख्याध्यापक यांनी आज विविध उच्च पदावर सेवेत असलेल्या महिला केवळ सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यामुळेच आहे असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षिका प्रतिभा पाटील यांनी केले..