एरंडोल (प्रतिनिधी) येथील आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नाने धरणगाव तालुक्यातील पाळधी दोनगाव येथील राहणाऱ्या राजकोरबाई आनंदा पाटील (वय 78) या वयोवृद्ध महिलेवर बायपास ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. यामुळे वृद्ध महिलेला जीवनदान मिळाल्यामुळे आरोग्य दूत विक्की खोकरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राजकोरबाई यांना तीव्र ह्रदय विकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या असता त्यांचा हृदयाच्या रक्त प्रमुख वाहिन्या ८० ते १०० टक्के बंद असल्याचे आढळून आले. त्यांना श्वास घेण्यास भरपुर त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. परंतु वय पण जास्त असल्या कारणाने बायपास शस्त्रक्रिया करणे फारच जोखमीही होती.
अश्या वेळी रजोरबाई याचे नातेवाईक अॅड.निलेश पाटील यांनी विक्की खोकरे यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. यानंतर विक्की खोकरे यांनी लागलीच स्वतःच्या रुग्णवाहिकाने त्यांना संगमनेर येथील मेडीकव्हर हॉस्पिटल येथे गोकुल गोठेकर यांच्या मदतीने बायपास शस्त्रक्रियासाठी दाखल केले. तेथे हृदयरोग तज्ञ डॉक्टरांनी ताबडतोब तिच्यावर बायपास सर्जरी केली. सर्जरी नंतर राजोरबाईला नवजीवन मिळाले आहे.