मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथील आदिवासी वसतिगृहातील शिपाई कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. नवीन बाबुलाल गोहर (वय ५२) असे मयत कर्मचाऱ्याचे नावे आहे.
आत्महत्येची ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. नवीन याची पत्नी रंजिता सात दिवसांपासून माहेरी गेली असून नवीन हा घरात एकटाच होता. याचवेळी नवीन याचा भाऊ मनोज गोहर दुपारी वरणगाव येथून मनोज हा भावाला भेटण्यासाठी मुक्ताईनगर येथे आला होता. घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तसेच संपर्क साधल्यानंतरही फोन न घेत नसल्याने मनोज यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा छताच्या पंख्याला दोरी बांधून नवीन याने गळफास घेतल्याचे दिसले.