जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अँड. जमील देशपांडे यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे.
अँड. जमील देशपांडे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या, जळगाव जिल्हा अध्यक्ष (जळगाव शहर, जामनेर, भुसावळ, मुक्ताईनगर विधानसभा)पदी आपली नेमणूक करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे व कार्यक्रम इत्यादी आपण वेळोवेळी आपल्या संघटनेत निष्ठेने राबवावी. “मराठी बांधवांना, भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल अशा प्रकारचे कार्य आपल्या हातून पड़ो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अँड. जमील देशपांडे यांना पदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.