जळगाव (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातर्फे करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून झाली. त्यानंतर पर्यवेक्षक प्रा. स्वाती बऱ्हाटे आणि समन्वयक प्रा. उमेश पाटील यांनी देखील प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमात सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रा. संदीप वानखेडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग तसेच त्यांच्या साहित्यातील क्रांतिकारी लेखनशैलीवर प्रकाश टाकला. त्यांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध अण्णाभाऊ साठे यांनी उभ्या केलेल्या आवाजाची महती सांगितली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. रणजीत पाटील यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.