जळगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन भाचीवर नराधम मामाने चाकूच्या धाकावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना जळगावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील रहिवाशी असलेली एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह शहरातील एका भागात राहते. आठ दिवसांपुर्वी (तारीख आठवत नाही) तिचा मामा राजाराम बारेलाल कुंजाम (रा. कोल्हे हिल्स गॅस गोडावून जळगाव) याने नात्याने भाची असलेल्या या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितले तर तुला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी राजाराम कुंजामच्या विरोधात पिडीत अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी रात्रीच अटक केली आहे.