भुसावळ (प्रतिनिधी) मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील पुणतांबा आणि कान्हेगाव स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन- इंटरलॉकिंग आणि नॉन- इंटरलॉकिंग कामासाठी १७ ते २८ जूनदरम्यान ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आहे. यामुळे अप अन् डाऊन मार्गावरील १४ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून चार गाड्यांच्या मार्गात परिवर्तन तर चार गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या !
रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये गाडी क्रमांक ०१९२२ वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाँसी – पुणे स्पेशल गाडी १९ व २६ जून रोजी रद्द, गाडी क्रमांक ०१९२१ पुणे- वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाँसी स्पेशल गाडी २० व २७ जून रोजी रद्द, गाडी क्रमांक ०७६२३ नांदेड- हडपसर स्पेशल एक्स्प्रेस १९ जून रोजी रद्द, गाडी क्रमांक ०७६२४ हडपसर- नांदेड स्पेशल एक्स्प्रेस २० जून रोजी रद्द, गाडी क्रमांक ०२१३२ जबलपूर- पुणे स्पेशल एक्स्प्रेस २३ जून रोजी रद्द, गाडी क्रमांक ०२१३१ पुणे- जबलपूर स्पेशल एक्सप्रेस २४ जून रोजी रद्द, गाडी क्रमांक २२२२३ मुंबई- साई नगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस २९ व ३० जून रोजी, गाडी क्रमांक २२२२४ साई नगर शिर्डी- मुंबई वंदे भारत एक्सप्रेस २९ व ३० रोजी रद्द, गाडी क्रमांक २२१४७ दादर-साईनगर शिर्डी साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस २८ जून रोजी रद्द, गाडी क्रमांक २२१४८ साईनगर शिर्डी- दादर साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस २९ जून रोजी रद्द, गाडी क्रमांक १२१३१ दादर- साईनगर शिर्डी त्री-साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस २९ जून रोजी रद्द, गाडी क्रमांक १२१३२ साईनगर शिर्डी येणार-दादर त्री-साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ३० जून रोजी रद्द, गाडी क्रमांक ११०४१ दादर- साईनगर शिर्डी एक्सप्रेस (व्हाया पुणे) २९ जून रोजी रद्द व गाडी क्रमांक ११०४२ साईनगर शिर्डी- दादर एक्सप्रेस ३० जून रोजी रद्द करण्यात आली आहे.
चार गाड्यांच्या मार्गात बदल !
१७६२९ पुणे- नांदेड़ एक्सप्रेस २५ ते २९ जूनदरम्यान कुर्दुवाडी लातूर रोड- परळी- परभणी मार्गे धावेल, तर १७६३० नांदेड-पुणे एक्सप्रेस २६ ते ३० जूनपर्यंत कुर्दुवाडी- लातूर- परळी परभणी मार्गे धावणार आहे. ११०७८ जम्मूतवी पुणे झेलम एक्सप्रेस २७ व २८ जून रोजी मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईनऐवजी इगतपुरी कल्याण पनवेल मार्गे पुणे धावेल, तर १२७८० हजरत निजामुद्दीन वास्को गोवा सुपरफास्ट एक्सप्रेस २८ आणि २९ जून रोजी मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईनऐवजी इगतपुरी- कल्याण पनवेल- पुणे मार्गे पुढे नियमित मार्गाने धावणार आहे.