TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूल चे वर्चस्व

vijay waghmare by vijay waghmare
August 19, 2025
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि. १९ प्रतिनिधी – जळगाव तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धा – २०२५ अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या बॅडमिंटनपटूंनी तीन सुवर्ण, एक रजत, एक कांस्य पदक मिळवत आपले वर्चस्व अधोरेखित केले. अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडानुभूती मधील बॅडमिंटन हॉल येथे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी जळगाव तालुका क्रीडा प्रमुख प्रशांत कोल्हे व अन्य शाळांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेमध्ये जळगाव तालुक्यातील २८ संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या मान्यतेने ही स्पर्धा जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्टस अकॅडमी द्वारे आयोजित केले होती. स्पर्धेच्या प्रथम स्थान, द्वितीय स्थान व तृतीय स्थान प्राप्त झालेल्या संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड व अनुभूती स्कूल द्वारे प्रायोजित सुवर्ण, रजत व कांस्यपदक देण्यात आले. अंतिम सामन्यांपर्यंत चुरसीच्या झालेल्या या स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलला १४ वर्षा खालील मुलांच्या संघात, १९ वर्षा खालील मुलांच्या व मुलींच्या संघाने प्रथम स्थान प्राप्त करीत सुवर्ण पदक मिळविले तर १७ वर्षा खालील मुलांच्या संघाने द्वितीय स्थान मिळविले त्यामुळे त्यांना रजत पदकाने गौरविण्यात आले. मुलींच्या १७ वर्षाखालील संघाने तृतीय क्रमांक मिळवित कास्य पदक प्राप्त केले. सर्व विजयी खेळाडूंना पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी जैन स्पोर्टस अकॅडमीचे अरविंद देशपांडे, मंजूषा भिडे, कुलदीप पांडे, मनिषा देशमूख, श्री. राहूल, किशोर सिंह, दिपीका ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अनुभूती स्कूलच्या यशस्वी खेळाडूंचे कौतूक अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, जैन स्पोर्टस अकॅडमीचे रविंद्र धर्माधिकारी व सहकाऱ्यांनी केले. विद्यार्थ्यांना बॅडमिंटन प्रशिक्षक किशोर सिंह व दीपिका ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. पंच म्हणून जाजिब शेख, कोनिका पाटील, दिव्यांश बैद, पूनम ठाकूर, श्री. सोमाणी यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी समीर शेख, विकास बारी, शुभम पाटील यांच्यासह अनुभूती स्कूल व जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

फोटो ओळ

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

शालेय बॅडमिंटन स्पर्धेत यशस्वी झालेल्या अनुभूतीच्या खेळाडूंसह किशोर सिंह, मनिषा देशमुख, अरविंद देशपांडे, कुलदिप पांडे, श्री. राहूल,दीपिका ठाकूर आदी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
जळगाव

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

July 5, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
जळगाव

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

July 4, 2026
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ संपन्न; रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

July 4, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

जय श्रीराम बहुद्देशीय मंडळ'ची कार्यकारिणी जाहीर, यंदा २६ व्या वर्षात पदार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आज रात्रीतून बकाले यांचे निलंबन करण्यासह डीई लावतो, आय.जी. शेखर यांचे आ.चव्हाण यांना आश्वासन !

September 14, 2022

सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसच्या वाटेवर

January 27, 2021

राणा दाम्पत्यासंदर्भातील आणखी एक व्हिडीओ समोर येणार ; कृपाल तुमाणे

April 28, 2022

जळगाव : अनैतिक संबंधात अडसर, अल्पवयीन मुलाचा खून करणाऱ्याला जन्मठेप !

September 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group