जळगाव (प्रतिनिधी) साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात १० वी, १२ वी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी ६०% किंवा त्यापेक्षा जास्त टक्के गुण प्राप्त झाले असतील. अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुणक्रमाकांनुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यास निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी १५ सप्टेंबर, २०२१ च्या आत संपूर्ण कागदपत्रांसह मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी जिल्हा कार्यालयात संर्पक करावा, उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. असे ताराचंद कसबे, जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे
अर्जासोबत मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेटसह जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रांसह कार्यालयात संपर्क साधावा. अधिक माहिती 0257-2263294 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असेही जिल्हा व्यवस्थापक कसबे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.