जळगाव (प्रतिनिधी) येथील उत्तर महाराष्ट्र माथाडी इतर श्रमजीवी असंरक्षित व असंघटीत कामगार संघटना, जळगाव जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत गाठे यांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.जमील देशपांडे यांनी केली.
संपूर्ण जिल्ह्यात माथाडी कामगार संघटने चा विस्तार करणार असल्याची माहिती याप्रसंगी श्रीकांत गाठे यांनी दिली. जिल्ह्यामधील माथाडी कामगार व इतर श्रमजीवी कामगारांबाबत विविध स्तरावर समस्या मांडण्याबाबत संघटना कार्यरत आहे. श्रीकांत गाठे यांना पुढील वाटचालीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, सुरेश पाटील पाचोरा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.