TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पेरमिलीवासियातर्फे प्रभारी अधिकारी पंकज सपकाळेंचा सपत्नीक नागरी सत्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गडचिरोली (वृत्तसंस्था) उप पोलीस स्टेशन पेरमिलीचे प्रभारी अधिकारी पंकज सपकाळे यांची गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने अमरावती परिक्षेत्रात नुकतीच बदली झाली होती. यानिमित्ताने तक्षशिला बुद्ध विहार व पेरमिली नागरिकांच्यावतीने नुकताच त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेरमिलीवासियातर्फे प्रभारी अधिकारी पंकज सपकाळे यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला.

गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात नोकरी करत असताना पेरमिली परिसरातील प्रत्येक नागरिकांशी ते जोडले गेले. पोलीस आणि जनता यांचे संबंधात जवळिकता निर्माण केली. या समारंभात बोलताना अनेकजण भावूक झाले. २०१८ पासून आतापर्यंत त्यांनी विविध योजना येथील गरीब जनतेकरिता राबविल्या. गडचिरोली सा. पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक समिर शेख, सोमय मुंढे, अनुज तारे व अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली “दादलोरा खिडकीच्या” माध्यमातून अनेक शिबिरे मेळावे आयोजित करून शासकीय योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यामुळेच लोकांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकीचा जिव्हाळा निर्माण झाला. कोणतीही समस्या इथला माणूस त्यांच्याजवळ हक्काने मांडू लागला आणि ती समस्या सोडविण्याकरिता ते पाठपुरावा करून समस्या सोडवल्याशिवाय स्वस्थ बसत नव्हते असा अनेकदा अनुभव आला.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पेरमिली पासून दुर्गम भागात असलेल्या गावांत विज रस्ते मोबाईल नेटवर्क पोहचले पाहिजे याकरीता सातत्याने ग्रामस्थांच्या मिटिंग घेवून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. शासकीय योजना आणि शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी नागरिकांना अहिरे आलापल्लीला जावे लागत असत. येथील गरीब जनतेचा वेळ आणि पैसा वाचावा याकरिता पोलीस स्टेशन पेरमिली येथेच मेळावा आयोजन करून करून आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, लायसन्स, संजय गांधी निराधार योजना, मुख्यमंत्री सोलर पंप योजना, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, राशन कार्ड, शेतकऱ्यानंकरता कृषीसमृद्धी योजना अंतर्गत शेवगा लागवड मोफत बियाणे, मत्स्यपालन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत विहिरी मंजूर करून दिल्या. महिलांचे जीवनमान उंचावणे म्हणून महिला मेळाव्याचे आयोजन करून त्यांना कुक्कुटपालन व इतर उद्योग करण्याचे आवाहन केले. त्यातूनच आलदंडी चंद्रा चंद्राटोला येथे आज मोठ्या प्रमाणात कुकूटपालन बचत गटामार्फत केले जात आहे. अनेक मुलींनी नर्सिंग, ब्युटी पार्लर सारखे कोर्सेस करून पोलिस दलाच्या माध्यमातून स्वयंरोजगार मिळवला.

गडचिरोली पोलीस दलाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांसाठी अनेक कोर्सेस उपलब्ध करून त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. पेरमिली येथे वाचनालय व अभ्यासिका सुरु केली. माणुसकीची भिंत बांधून त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला. आपल्या स्वतःच्या मुलीचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करून ही रक्कम एका नक्षल पीडित कुटुंबाला देवून खाकी वर्दीतील देव माणसाचं दर्शन घडवून दिले. तसेच अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला. अशा बहुआयामी पोलिस अधिकार्‍याच्या निरोप समारंभाच्या वेळी येथील लोक खूपच भावुक झाले. पोलिसांच्या जवळ जायला नागरिक भित होते. तिथे आज नागरिक पोलिसांचा त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित केला. हे संवेदनशील भागाचं बदलते चित्र आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेरमिलीचे माजी सरपंच प्रमोद आत्राम, सत्कारमूर्ती संध्या सपकाळे पीएसआय धनंजय पाटील, पीएसआय धवल देशमुख, डॉ. दुर्गे, आसिफ पठाण, श्रीनिवास बंडमवार, डॉ. मडावी, मेश्राम, श्रीकांत बंडमवार, राज बोमणवार, उपस्थित होते. महिलांची उपस्थिती प्रेक्षणिय होती. कार्यक्रमाचे आयोजन तक्षशिला बुद्ध विहाराचे सर्व सदस्य शंकर कुंभारे, श्रीकांत दुर्गे यांनी केले व सुत्रसंचलन साबळे व आभार श्रीकांत दुर्गे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

'महाराष्ट्र बंद' म्हणजे सरकार स्पॉन्सर्ड दहशतवादच : देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी; निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष

December 3, 2020

आमदार राजुमामा भोळे यांची पाचपावली कट्टा व कुबेर ग्रुपला सदिच्छा भेट

January 27, 2021

पदोन्नतीच्या ३३ टक्के आरक्षित पदे मागासवर्गीयांना पदोन्नती देऊन भरावे !

May 19, 2021

जरांगे यांची बदनामी करण्यासाठी मॉर्फिंग व्हिडिओ व्हायरल केले जाऊ शकतात, जनतेने विश्वास ठेवू नये !

March 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group