TheClearNews.Com
Sunday, January 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘महाराष्ट्र बंद’ म्हणजे सरकार स्पॉन्सर्ड दहशतवादच : देवेंद्र फडणवीस

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी या बंदला ढोंगीपणाचा कळस असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसंच आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे.

फडणवीस म्हणाले की, हे तेच सरकार आहे ज्यांनी पाण्यासाठी मावळला शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. बंद जबरदस्तीने केला जातोय, हे बंद म्हणजे पोळी भाजण्याचं काम करत आहेत. दमदाटी करून, प्रशासनाचा वापर, धमकी देऊन बंद केला आहे. सरकार पुरस्कृत हा बंद आहे. कारण ईस्टर्न फ्री वे वर दहा कार्यकर्ते उपस्थित होते आणि पोलीस तमाशा पाहात होते, असं फडणवीस म्हणाले.

READ ALSO

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

महाविकास आघाडी सरकारने आज राज्यभर बंद पुकारला आहे. हा पुकारलेला बंद ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असा हल्ला करत, आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याच सरकारने मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. गोळीबार करणाऱ्यांना आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का? असा सवाल करतानाच मावळमध्ये गोळीबार झाला तो जालियनवाला बाग होता, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. आजचा बंद संवेदना दाखवणारा नाही तर राजकीय पोळी भाजण्यासाठीचा आहे. या बंदला लोकांचा प्रतिसाद नाही. प्रशासनाची मदत घेऊन दमदाटी करून पोलीस, जीएसटी प्रशासनाचा वापर करून लोकांना बंद करायला भाग पाडलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपण समोर आला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे. लखीमपूरच्या घटने करता महाराष्ट्रात बंद केला जातो. पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा देत नाही. शेतकरी संकटात आहे. हे सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जाऊन २५ हजाराच्या घोषणा केल्या, ५० हजाराच्या घोषणा केल्या, पण या सर्व घोषणा हवेत विरल्या. विविध आपत्तीत मदतच केली नाही. केली तरी तोकडी केली. त्यामुळे घटक पक्षच म्हणून लागले भाजपचं सरकार बरं होतं. हे सरकार मदत करत नाही त्यामुळे आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे, अस फडणवीस म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
जळगाव

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
जळगाव

भाजपाच्या २७ बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

January 9, 2026
जळगाव

कपड्यांवर समस्या, मनावर परिणाम! : प्रभाग ६ मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आगळावेगळा प्रचार

January 8, 2026
जळगाव

मनपा निवडणुकीसाठी १३८ अपक्षांना चिन्ह वाटप

January 4, 2026
Next Post

लखीमपूर हिंसाचार : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला तीन दिवसांची पोलीस कोठडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाला रोखण्याचा सुवर्णकाळ वाया गेला – आझाद यांची सरकारवर टीका

September 17, 2020

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 2 मार्च 2024 !

March 2, 2024

धक्कादायक ! झोपेत असताना पत्नीने ब्लेडने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट !

February 18, 2022

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू !

July 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group