TheClearNews.Com
Saturday, November 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पीएम-सूर्यघर योजनेत जळगाव परिमंडलाची झेप

_100 मेगॉवट क्षमता गाठणारे राज्यातील केवळ दुसरे परिमंडल

vijay waghmare by vijay waghmare
September 22, 2025
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत जळगाव परिमंडलातील 35 हजार ग्राहक छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीजनिर्मिती करत आहेत. त्यांची स्थापित क्षमता 128.19 मेगावॅट असून, राज्यात शंभरी पार करणारे जळगाव हे नागपूरनंतर महावितरणचे केवळ दुसरे परिमंडल आहे.
दरमाह तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी-2024 मध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केलेली आहे. घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे 120 ते 360 युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी या योजनेत मिळत आहे. त्यामुळे या योजनेस जळगाव परिमंडलात वीजग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसवता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना मेळाव्यांद्वारे प्रोत्साहन देण्यात येत आहे. याबरोबरच महावितरणकडून 10 किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे तसेच सौर नेटमीटरदेखील महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून निर्माण झालेली वीज संबंधित ग्राहकांना दिवसा वापरता येते. शिवाय ग्राहकाची गरज भागवून वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून ती संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी 60 हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल 78 हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. 300 युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. तसेच सुमारे 25 वर्षे या सौर प्रकल्पांतून घरातील वीजवापरासाठी मोफत वीज उपलब्ध होणार आहे.
पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प उभारण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प उभारल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे. तसेच महावितरणच्या वेबसाईटवरील अक्षय ऊर्जा पोर्टलवरही अधिक माहिती व अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
महावितरणच्या जळगाव परिमंडलात योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत परिमंडलातील 34 हजार 757 ग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला आहे. यात जळगाव मंडलातील 21 हजार 354 ग्राहकांनी 79.37 मेगावॅट, धुळे मंडलातील 9 हजार 254 ग्राहकांनी 33.97 मेगावॅट तर नंदुरबार मंडलातील 4 हजार 419 ग्राहकांनी 14.85 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच घराच्या छतावर बसवून वीज निर्मिती सुरू झालेली आहे.

पीएम-सूर्यघर योजनेत सौर ऊर्जा संच बसवणाऱ्या ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळत आहे. शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या या योजनेचा घरगुती ग्राहक व निवासी संकुलांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून यासंबंधीच्या सर्व प्रकिया ऑनलाईन व सुलभ करण्यात आली आहे.
– आय.ए. मुलाणी, मुख्य अभियंता, महावितरण, जळगाव परिमंडल

READ ALSO

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

November 7, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

November 7, 2026
जळगाव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान

November 6, 2026
अमळनेर

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

November 6, 2026
जळगाव

जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका

November 6, 2026
गुन्हे

अल्पवयीन चोरट्यासह एकाकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत

November 6, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नासाठी मुलगा पाहायला निघाले पण वाटेत घडलं भयंकर ; शिक्षक ठार, पत्नी जखमी !

June 2, 2023

धक्कादायक : जळगावातील केबलवर पाकिस्तानी चॅनलचे प्रसारण, कार्यक्रमात भारताविषयी आक्षेपार्ह चर्चेचा आरोप !

August 16, 2023

परिस्थिती सुधारली नाही तर कडक निर्बंध ; नाशिककरांना भुजबळांचा इशारा

December 7, 2020

कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी मोडली एफडी

April 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group