TheClearNews.Com
Tuesday, August 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

vijay waghmare by vijay waghmare
June 27, 2026
in जळगाव, राज्य, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) – नशिराबाद येथे पत्रकारांना अश्लाघ्य शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गंभीर घटनेचा निषेध नोंदवत नशिराबाद पत्रकार संघाने शुक्रवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना निवेदन सादर केले. संबंधित खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार समाजातील घडामोडी वस्तुनिष्ठपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे अत्यंत जबाबदारीचे कार्य करीत असतात. सत्य घटनांचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रकारांशी अपमानास्पद भाषा वापरणे, शिवीगाळ करणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देणे हे केवळ पत्रकारांचा अवमान करणारे कृत्य नसून, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला थेट आघात आहे.
लोकप्रतिनिधींनी संविधानिक मूल्यांचे पालन करून लोकशाही संस्थांचा सन्मान राखणे अपेक्षित असताना अशा प्रकारचे वर्तन अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे पत्रकार संघाने नमूद केले आहे. पत्रकारांना धमकावून त्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाही व्यवस्थेस घातक असून, अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
नशिराबाद पत्रकार संघाने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. पत्रकारांवरील अशा प्रकारच्या धमक्या व दडपशाहीच्या घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत, यासाठी कठोर संदेश देणारी कारवाई होणे गरजेचे असल्याचे संघाने अधोरेखित केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी निवेदन स्वीकारून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल व नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी नशिराबाद पत्रकार संघाचे सुनील भावसार, प्रा. विश्वनाथ महाजन, चंदन पाटील, हरीश पाटील, सुनील महाजन, सागर मोरे यांच्यासह नशिराबाद पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

छायाचित्र परिचय :
पत्रकारांना धमकी दिल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत संबंधित खासदाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना सादर करताना नशिराबाद पत्रकार संघाचे पदाधिकारी

READ ALSO

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonNashirabad Journalists' Association takes a firm stand over the threat to journalists; demands strict action against MP Sanjay Dina Patil.

Related Posts

गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
जळगाव

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणाने महिलेचं कापलं नाक ; मुख्यमंत्र्यांच्या नावे फेसबुक पोस्ट लिहित पीडितेची आत्महत्या

September 8, 2021

सासरच्यांची जावायाला बेदम मारहाण ; जळगाव पोलिसात गुन्हा दाखल !

October 24, 2023

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : ‘मास्टर माइंड’ गौतमला तीन दिवसांची पोलीस कोठडी !

January 25, 2022

धरणगावात उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group