TheClearNews.Com
Saturday, November 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!

३२ फुटांचा भव्य ‘लामण दिवा’; सात ज्योतींतून समृद्धीचा संदेश

vijay waghmare by vijay waghmare
November 7, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) – अंधार दूर करण्यासाठी केवळ एक दिवा पुरेसा नसतो, तर प्रत्येकाच्या आयुष्यात आशेची, विश्वासाची आणि प्रगतीची ज्योत पेटणे आवश्यक असते. कुणाच्या आयुष्यात संघर्षाचा अंधार असतो, कुणाच्या वाट्याला परिस्थितीचे चटके असतात, तर कुणी स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अहोरात्र धडपडत असतो. अशा प्रत्येकाच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश पोहोचावा, या उदात्त भावनेतून जळगावच्या काव्यरत्नावली चौकात आकाशातून अवतरल्याचा भास निर्माण करणारा तब्बल ३२ फुटांचा भव्य ‘लामण दिवा’ उभारण्यात आला आहे. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून साकारलेली ही कलाकृती केवळ दीपोत्सवाची सजावट नसून, मानवी जीवनाला सात दिशांनी प्रकाशमान करण्याचा एक सुंदर विचार आहे.

भारतीय संस्कृतीत ‘दीप’ याला केवळ प्रकाशाचे साधन मानले जात नाही. तर तो ज्ञान, मांगल्य, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. याच परंपरेला आधुनिक कलात्मकतेची जोड देत साकारलेल्या या लामण दिव्याला सात ज्योतींचे कोंदण लाभले आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, संरक्षण आणि धार्मिक अशा जीवनाच्या सात महत्त्वपूर्ण अंगांना या ‘सप्तज्योतीं’ मधून प्रतीकात्मक स्वरूप देण्यात आले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात या सातही क्षेत्रांमध्ये भरभराट व्हावी, हाच या संकल्पनेमागील मूलभूत विचार आहे.

READ ALSO

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

या दिव्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा ‘बंध आकाशाशी, नातं भूमीशी’ जोडणारं आहे. नाजूक दोऱ्यांमध्ये गुंफलेला हा भव्य दिवा जणू आकाशातून देवत्वाचा आशीर्वाद घेऊन पृथ्वीवर अवतरला आहे, असे दृश्य पाहणाऱ्याच्या मनात उभे राहते. त्याचा बंध आकाशाशी असला, तरी त्याचे नाते मात्र मातीशी आहे. माणसाने स्वप्ने आकाशाएवढी मोठी पाहावीत; मात्र त्या स्वप्नांना बळ मिळावे ते आपल्या मातीतून, आपल्या कष्टातून आणि आपल्या संस्कारांतून, असा अर्थही या कलाकृतीतून व्यक्त होतो.

या ‘सप्तज्योतीं’ मधील प्रत्येक ज्योत जवळपास सहा फुटांपेक्षाही मोठी आहे. मानवी अंतःकरणातील भावना, आशा, आकांक्षा आणि संवेदनशीलतेचे प्रतिबिंब या ज्योतींतून व्यक्त होते. संपूर्ण दिव्याला दिलेला सोनेरी रंग हा संपन्नता, ऐश्वर्य आणि मांगल्याचे प्रतीक ठरतो. सुमारे ८०० किलो वजनाची आणि ३२ फूट उंचीची ही भव्य कलाकृती काव्यरत्नावली चौकाच्या सौंदर्यात वेगळीच भर घालत आहे.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली या लामण दिव्याची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून जैन इरिगेशनच्या कला विभागातील विजय जैन, डेव्हलपमेंट विभागातील अनिल पाटील, चंद्रशेखर विरपणकर आणि त्यांच्या २० सहकाऱ्यांनी या कलाकृतीसाठी विशेष परिश्रम घेतले. दिव्याच्या सजावटीसाठी राजेश नाईक यांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभले.

कोट

जळगावकरांचे वैभव वाढो या मंगल भावनेतू ‘लामण दिवा’ – अशोक जैन
प्रकाशाचा उत्सव साजरा करताना दुसऱ्याच्या आयुष्यातही प्रकाश निर्माण करण्याची जाणीव जागृत व्हावी, हा या लामण दिव्याचा खरा संदेश आहे. कारण दिवा स्वतः जळतो, तेव्हाच परिसर उजळतो. त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाच्या आयुष्यात प्रगतीची ज्योत पेटविण्यासाठी संवेदना, सहकार्य आणि समर्पणाची गरज असते. जळगावकरांच्या जीवनात सुख, समाधान आणि सर्वांगीण वैभव नांदो, या मंगल भावनेतून काव्यरत्नावली चौकात उभारलेला हा ‘लामण दिवा’ दीपोत्सवाला एक वेगळीच वैचारिक आणि कलात्मक उंची देत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonSaptajyot’ (Seven Flames) descends from the heavens!

Related Posts

गुन्हे

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

November 7, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

November 7, 2026
जळगाव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान

November 6, 2026
अमळनेर

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

November 6, 2026
जळगाव

जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका

November 6, 2026
गुन्हे

अल्पवयीन चोरट्यासह एकाकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत

November 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अभिनेत्री कंगना रनौतच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्याचे आदेश

September 14, 2020

चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांनी समाजशील नागरीक बनावे : ना. गुलाबराव पाटील !

July 30, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १४ जून २०२३ !

June 14, 2023

नाशिक विभागीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड

December 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group