TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

vijay waghmare by vijay waghmare
March 12, 2026
in जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई प्रतिनिधी – राज्यभरातील ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’ (PMAY-G) अंतर्गत घरकुल बांधकामासाठी मिळणारे अनुदान अपुरे असून, वाढत्या महागाईमुळे गरिबांना घर बांधणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला. घरकुल अनुदानाच्या रक्कमेत भरीव वाढ करून प्रलंबित असलेली कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
आमदार खडसे यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, सध्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी शासनाकडून केवळ १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र, सद्यस्थितीत बांधकाम साहित्याचे गगनाला भिडलेले भाव पाहता या अल्प रकमेत घर पूर्ण करणे लाभार्थ्यांना अशक्य झाले आहे. शासनाने २२ फेब्रुवारी २०२५ रोजी ५० हजार रुपयांचे वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेतला असला, तरी ऑक्टोबर २०२५ पासून अनेक लाभार्थ्यांना पुढील हप्ते मिळालेले नाहीत. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार लाभार्थी निधीअभावी या योजनेपासून वंचित असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, घरकुल बांधकामासाठी वाळूचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी लावून धरली.
या प्रश्नाला सविस्तर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. मंत्री गोरे म्हणाले की, “केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत २६९ चौ. फूट घरकुल बांधकामासाठी सध्या १.२० लाख रुपये दिले जातात. मात्र, राज्य शासनाने ४ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयानुसार ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२’ अंतर्गत राज्य हिश्श्यातून ५०,००० रुपयांची अतिरिक्त वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.”
या वाढीव ५० हजार रुपयांच्या वितरणाचे स्वरूप स्पष्ट करताना मंत्र्यांनी सांगितले की, यातील ३५,००० रुपये हे थेट घरकुल बांधकामासाठी दिले जातील, तर उर्वरित १५,००० रुपये हे लाभार्थ्यांच्या घरात ‘सौर ऊर्जा संच’ स्थापित करण्यासाठी वापरले जाणार आहेत. ही वाढीव रक्कम घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.
जळगाव जिल्ह्यातील परिस्थितीवर भाष्य करताना मंत्र्यांनी आकडेवारी सादर केली. त्यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात टप्पा-२ अंतर्गत १ लाख १९ हजार ३८७ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. तसेच ६३ हजार ३१४ लाभार्थ्यांना दुसरा, ३८ हजार ६६७ लाभार्थ्यांना तिसरा आणि ९ हजार २७ लाभार्थ्यांना चौथा हप्ता वितरित करण्यात आला आहे. निधीचे वाटप हे लाभार्थ्यांनी केलेल्या बांधकामाच्या टप्प्यानुसार थेट त्यांच्या बँक खात्यात केले जात आहे.
वाळूच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्याच्या नवीन वाळू निर्गती धोरणानुसार जळगाव जिल्ह्यातील १४ हजार ५५८ लाभार्थ्यांना घरकुलासाठी वाळू उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, संसदीय स्थायी समितीने घरकुल अनुदान वाढवण्याबाबत केलेल्या शिफारशी या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून, त्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आमदार एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित अनुदानाचा आणि सौर ऊर्जेच्या समावेशाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील हजारो बेघरांना हक्काचे आणि सोयीसुविधायुक्त घर मिळण्यास मदत होणार आहे.

READ ALSO

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
Next Post

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची मंगरूळ येथे सदिच्छा भेट

September 30, 2020

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर उसळला हिंसाचार ; घरांची जाळपोळ, १० जण जिवंत जळाले !

March 22, 2022

गुलाबराव वाघ यांना पोलीस संरक्षण द्या ; शिवसैनिकांचे तहसीलदारांसह पोलिसांना निवेदन !

July 6, 2022

आ. गिरीश महाजन यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा ; जमावबंदी आदेशाचे उल्लंघन !

November 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group