TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

vijay waghmare by vijay waghmare
September 7, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – मनपाकडून व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर बांधकामाची परवानगी मिळाल्याचे खोटे व बनावट कागदपत्रे तयार करुन सुरेश नंदलाल तलरेजा यांच्याकडून वेळोवेळी ३ कोटी ७२ लाख रुपये रक्कम उकळली. त्यानंतर संबंधित व्यवहाराची सौदापावती व पुरवणी करारनामा करुन ताब्यात असलेल्या मालमत्तेचे दुसरे खरेदीखत करुन त्यांची आर्थीक फसवणुक केल्याची घटना रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी के पी. इन्फ्रास्ट्रक्र, ममता अनिल साहित्या, अनिल खुबचंद साहित्या, खुबचंद प्रेमचंद साहित्या, नितीन खुबचंद साहित्या (सर्व रा. मोहाडी रोड), जयराम इन्फ्रास्ट्रक्र प्रोजेक्ट्स प्रा. लि. व विशाल रामगोपाल शर्मा (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील हॉटेल व इस्टेट ब्रोकर व्यावसायीक सुरेश तलरेजा यांची बांधकाम व्यावसायीकांसोबत ओळख आहे. त्यांनी शहरातील सीटी सर्वे नंबर २१२५/७ या ठिकाणी संत बाबा हरदासराम शॉपींग कॉम्पलेक्स नावाने व्यापारी संकुल बांधून तेथील दुकाने आणि ऑफिस विक्रीसाठ विक्रीसाठी आल्याची जाहीरात वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केली होती. त्यानुसार खुबचंद साहित्या यांनी तलरेजा यांना सन २०२१ मध्ये या व्यापारी संकुलातील तिसऱ्या मजल्यावरील ऑफिसची जागा विकत घेण्याबाबत सांगितले होते. दरम्यान, तलरेजा यांना या व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या
मजल्यावरील बांधकामाला परवानगी नसल्याचे समजल्यानंतर त्यांनी व्यवहार करण्यास नकार दिला होता.

READ ALSO

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

वेळोवेळी दिलेल्या रक्कमेची स्वतःच्या अक्षराने केली नोंद

साहित्या कुटुंबियांनी दि. १५ डिसेंबर २०२१ रोजी तलरेजा यांना त्यांच्या हॉटेल के पी. प्राईडमधील कार्यालयात बोलावून घेतले. महापालिकेने तिसऱ्या मजल्यापर्यंत बांधकामाला परवानगी सांगून मनपाचे लेटरहेड, नगररचना अधिकाऱ्याची सही व शिक्का असलेली कागदपत्रे दाखविल्यानंतर त्यानंतर सुरेश तलरेजा यांनी वेळोवेळी त्यांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे व रोख स्वरुपात रक्कम दिली असून याबाबतच्या नोंदी खुबचंद साहित्या यांनी स्वतः च्या हस्ताक्षरात स्वाक्षरी करुन डायरीमध्ये केल्या आहे.

सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

सुरेश तलरेजा यांनी दि. ६ सप्टेंबर रोजी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार के पी. इन्फ्रास्ट्रक्कर, ममता अनिल साहित्या, अनिल खूबचंद साहित्या, खुबचंद प्रेमचंद साहित्या, नितीन खुबचंद साहित्या (सर्व रा. मोहाडी रोड), जयराम इन्फ्रास्ट्रक्र प्रोजेक्ट्स प्रा. लि. व विशाल रामगोपाल शर्मा (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यातील जागेबाबत तयार केले खरेदीखत

जुलै २०२६ मध्ये तलरेजा यांचा ताबा असलेल्या मिळकतीचा परस्पर व्यवहार झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी महापालिकेत चौकशी केल्यानंतर त्यांना संबंधित व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यापर्यंतच बांधकामाला परवानगी दिली असल्याचे समजले. दरम्यान, ममता साहित्या, जयराम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स प्रा. लि. व विशाल शर्मा यांच्या लाभात दि. १० जून २०२६ रोजी नोंदणी केलेल्या खरेदीखतामध्ये तलरेजा यांच्या ताब्यातील जागेबाबत ओपन टेरेस असल्याचे दर्शवून खरेदीखत केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

तगादा लावल्यानंतर लेखी स्वरुपात दिला ताबा

ऑफिसच्या जागेबाबत ममता साहित्या यांनी दि. २८ मार्च २०२३ रोजी तलरेजा यांना सौदापावती करुन दिल्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर १ कोटी रुपये आरटीजीएद्वारे वर्ग केले. त्यानंतर संशयितांनी दिलेल्या मुदतीमध्ये बांधकाम पुर्ण न करुन दिल्याने दि. ४ मे २०२४ रोजी पुरवणी सौदापावती करारनामा करुन दिला. त्यावेळी सुद्धा वेळावेळी तलरेजा यांनी ३ कोटी ७२ लाख रुपये आरटीजीएसद्वारे पैसे ट्रान्सफर केले आहे. खरेदीसाठी सुरेश तलरेजा यांनी तगादा लावल्यानंतर दि. ११ जून २०२४ रोजी ममता साहित्यांनी लेखी ताबा पावती करुन देत प्रत्यक्ष ताबा दिला. दरम्यान, याठिकाणी तलरेजा यांनी इस्टेट ब्रोकरचे कार्यालय व रिडींग रुम सुरु केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBroker defrauded of ₹3.72 crore using forged construction permission documents.

Related Posts

जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खुन्नसने का पाहतो म्हणत तरुणाचा केला खून ; पाचोरा येथील घटना

February 19, 2025

शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सिताबाई तडवी यांचा मृत्यू

January 28, 2021

जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतिक्षा कायम ; जुलै संपूनही लहान धरणे तहानलेलीच !

July 29, 2025

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, २५ डिसेंबर २०२४ !

December 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group