
अमळनेर (प्रतिनिधी) – येथील खानदेश शिक्षण मंडळ कर्मचारी सहकारी पतपेढीची सर्वसाधारण सभा ५ रोजी उत्साहात संपन्न झाली. यावेळी सभासदांना लाभांश तसेच भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.
शहरातील जी.एस.हायस्कूल मधील आय एम ए हॉल येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सभासदांकडून जामीनकी कर्ज मर्यादेत वाढ करणे,सभासद पाल्यांसाठी विविध योजना सुरू करणे,सभासद विमा,सेवानिवृत कर्मचाऱ्यांना पतपेढीचे सभासदत्व सुरू ठेवणे यासह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली असून सकारात्मक भूमिका घेऊन संस्थेच्या हितासाठी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन संचालक मंडळाने दिले.यावेळी सभासदांना रोख स्वरूपात १० टक्के लाभांश व भेटवस्तू देण्यात आली.
यावेळी पतपेढीचे अध्यक्ष चंद्रकांत कंखरे,उपाध्यक्ष आर.जे.पाटील,सचिव जयश्री भालेराव,खजिनदार कैलास बाविस्कर,संचालक लक्ष्मण पाटील,किरण सनेर,राहुल पाटील,मनोहर पाटील,वैशाली पाटील,संजय बत्तीसे व संस्थेचे सेक्रेटरी भिका भावसार आदी उपस्थित होते.
















