जळगाव (प्रतिनिधी) – वीज बचत, विद्युत सुरक्षा आणि हरित ऊर्जेचा संदेश देण्यासाठी महावितरणच्या जळगाव विभाग कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वीज बचत, विद्युत सुरक्षेचे नियम आणि हरित ऊर्जेचे महत्त्व या विषयांवर विविध चित्रे साकारली. आपल्या कल्पकतेतून विद्यार्थ्यांनी वीजेचा काटकसरीने वापर, सुरक्षित वीजवापर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वक्तृत्व स्पर्धेतही विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची संधी मिळाली.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांच्यात ऊर्जा संवर्धन व विद्युत सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आणि हरित ऊर्जेचे महत्त्व या विषयांवर विविध चित्रे साकारली. आपल्या कल्पकतेतून विद्यार्थ्यांनी वीजेचा काटकसरीने वापर, सुरक्षित वीजवापर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वक्तृत्व स्पर्धेतही विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची संधी मिळाली.