जळगाव (प्रतिनिधी) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर योजनेतील व्यवसायातील प्रशिक्षण घेवून उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत आस्थापनामध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेण्याकरीता ११ डिसेंबर रोजी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, तंत्र निकेतन समोर, जळगाव येथे हा मेळावा होणार आहे.
या भरती मेळाव्याकरिता जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्यास भाग घेण्यासाठी संबंधित आस्थापना तसेच (ITI) उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी Apprenticeshipindia.org या वेबपोर्टलवर नाव नोंदणी करणे आवश्यक असून सदर नोंदणी करुन पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगावचे सहाय्यक प्रशिक्षण सल्लागार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.