जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मेहरूण तलावाच्या सौंदर्यात भर पडण्याच्या दृष्टीकोणातून तलावाच्या विकासासाठी राज्यशासनाच्या पर्यटन विभागाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून विकास कामांसाठी निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे. त्यानुसार मेहरूण तलाव परिसराचा विकास करून जळगाव शहराला एक अद्ययावत वॉटरफ्रंट उपलब्ध होणार आहे.
मेहरूण तलावाच्या विकास कामांमध्ये नागरिकांना चालण्यासाठी, व्यायामासाठी आणि फिरण्यासाठी तलावा भोवती फुटपाथ व पद पथ तयार होणार असून परिसराची स्वच्छता व सौंदर्यवृद्धी करण्याच्या अनुषंगाने हिरवाई, बाग, झाडे आणि आकर्षक लाइटिंगची सुविधा करण्यात येणार आहे. तसेच सकाळी व संध्याकाळी नागरिकांना विनामूल्य व्यायाम साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. शहरातील नागरिकांना कुटुंबियांसोबत वेळ घालवता यावा याकरीता आरामदायी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने गाझेबो व लॉन, गार्डन तयार करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे कॅफे व रेस्टॉरंट्स, फाउंटन व इलेक्ट्रिफिकेशन (आकर्षक प्रकाशयोजना), रेलींग व सुरक्षिततेसाठी उपाययोजना, टॉयलेट ब्लॉक व पार्किंगची सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या कामासाठी पर्यटन विकास योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून वर्षभरात काम पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची डिझाईन आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी तयार केला आहे.
गिरणा पंपिंग स्टेशन परिसराच्या विकासासाठी दहा कोटींचा निधी
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे गिरणा नदीकाठी असलेल्य गिरणा पंपिंग स्टेशन परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येणान आहे. हा प्रकल्प प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मंजूर झाल असून, दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे यामध्ये पायाभूत सुविधा, सौंदर्गीकरण व नागरिकांसाठी सार्वजनिक सोयी यांचा समावेश आहे. या ठिकाणी प्रत्येक जळगावकर आणि कुटुंबीयांना आरामदायी, सुरक्षित व आनंददायी वातावरणात वेळ घालवता यावा यासाठी कॅफे व रेस्टॉरंट, वॉशिंग मिट व पार्किंग शौचालय व स्वच्छतेची सुविधा, हिरवाईने नटलेला बगिचा, जॉगिंगसाठ पादचारी रस्ता, मुलांसाठी खेळण्याचा स्वतंत्र क्षेत्र, लहानग्यांसाठ सुरक्षित खेळाची जागा कंपाउंड भिंत व प्रवेशद्वार, बाह्य विद्युतिकरण (लाईटींगची व्यवस्था) करण्यात येणार आहे.