जळगाव (प्रतिनिधी) जून्या वादातून टोळक्याने मोबाईल खेळत बसलेल्या हर्षल उर्फ बब्या कुणाल पाटील (वय १८, रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी) या तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करीत गंभीर केले. ही घटना रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनीतील राजशाळेसमोर घडली. जखमी हर्षलची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.
शहरातील रामेश्वर कॉलनीतील एकनाथ नगरात हर्षल उर्फ बब्या पाटील हा आई, वडीलांसह वास्तव्यास आहे. तो शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीचे शिक्षण घेत आहे. रविवारी दुपारच्या सुमारास तो राज शाळेच्या परिसरात अर्ध्यातासानंतर पोलीस घटनास्थळी ज्याठिकाणी तरुणावर हल्ला झाला, त्याच ठिकाणी अंत्यविधीची तयारी सुरु होती. टोळक्याने हल्ला केल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेच्या सुमारे अर्धातासानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून घटनास्थळी दाखल झालेला जमाव पांगविण्यात आला.
अर्ध्यातासानंतर पोलीस घटनास्थळी
ज्याठिकाणी तरुणावर हल्ला झाला, त्याच ठिकाणी अंत्यविधीची तयारी सुरु होती. टोळक्याने हल्ला केल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेच्या सुमारे अर्धातासानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून घटनास्थळी दाखल झालेला जमाव पांगविण्यात आला.
नितीन देशमुख याच्यासोबत मोबाईल खेळत बसलेला होता. सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन तीन जण त्याठिकाणी आले. त्यांनी मोबाईल खेळत बसलेल्या हर्षल व त्याचा मित्र नितीन यांना बघून हे दोघेपण त्यादिवशी सोबत होते, असे म्हणत त्यांच्यावर हल्ला केला. त्या तिघांनी धारदार कोयत्याने आणि चॉपरने हर्षलच्या डोक्यावर, कपाळावर आणि मानेवर वार करीत त्याला गंभीर जखमी केले तर त्याचा मित्र नितीन हा तेथून पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या हर्षलच्या शरिरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या मित्रांनी तात्काळ एका रिक्षात टाकून त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा शोध सुरु
तरुणावर टोळक्याने हल्ला केल्याची संपुर्ण घटना राजविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यानुसार हल्लखोरांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.















