जळगाव (प्रतिनिधी) आर्मीच्या अधिकाऱ्याची चोरट्याने रेल्वेतून लांबवली होती. दोन दिवस आर्मीच्या जवानांनी चोरट्याचा शोध घेतला, मात्र बँग मिळून येत नसल्याने त्या अधिकाऱ्याने थेट पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे दालन गाठत आपली कैफियत मांडली. पोलीस अधीक्षकांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कामाला लावले. एलसीबीच्या पथकाने अवघ्या अडीच तासात चोरी गेलेल्या बॅगसह चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. ३० वर्षाची सेवा झाल्यानंतर पदोन्नतीसाठीचे कागदपत्रे मिळाल्याच्या आनंदात आर्मीच्या पथकाने पोलीस अधिक्षकांचे आभार तर मानलेच शिवाय संपूर्ण एलसीबी टीमला मिठाई खाऊ घातली.
आर्मी जवानांनी संपूर्ण रेल्वेत राबवली शोध मोहीम !
भारतीय सैन्य दलातील अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसोबत आर्मी रेल्वेने राजस्थानहून पुणे आर्मी कॅम्प इथे जात होते. दि. २१ रोजी रेल्वे काही कामासाठी जळगाव येथे थांबली असतांना चोरट्याने ही संधी साधत सुभेदार मेजर साहेबांची बॅग लांबवली. ही घटना चाळीसगावच्या पुढे गेल्यावर सुभेदाराच्या लक्षात आल्याने त्यांची संपूर्ण टीम खळबळून जागी झाली. संशयीत चोरट्याचा शोध घेण्यासाठी आर्मी जवानांनी संपूर्ण रेल्वेत शोध मोहीम राबवली, मात्र थांगपत्ता लागला नाही. जळगावात स्वच्छतागृहाचा उपयोग करण्यासाठी गेले असताना चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सीसीटिव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद !
सुभेदार आणि चार कर्मचारी तात्काळ जळगावला पोहचले. त्यांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात पथकाने दिवस घालवल्यावर एक युवक बॅग घेऊन जाताना कैद झाला. तर पदोन्नतीला लागला असता ब्रेक आर्मीचे सुभेदार मेजर हे पोलीस दलातील पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी असतात. त्यांची बॅग चोरी झालेल्या सुभेदार साहेबांच्या मार्गदर्शनात ८०० जवानांची बटालियन कार्यरत आहे. काही दिवसात त्या सुभेदारांची पदोन्नती होणार होती आणि त्या संदर्भातील सर्व महत्त्वाचे दस्तऐवज बॅगमध्ये होते. बॅगेत रोकड देखील होती. मात्र त्यापेक्षा सुभेदारांची कागदपत्रे आणि ओळखपत्र महत्त्वाचे होते. पुणे कॅम्प येथे पदोन्नती संदर्भात त्यांना ते कागदपत्रे जमा करावयाची होती. जर कागदपत्रे मिळाले नसते तर त्यांची ३० वर्षांची सेवा मातीमोल होऊन त्यांची पदोन्नती रखडून त्याला ब्रेक लागणार होता.
पोलीस अधीक्षकांनी लावली यंत्रणा कामाला
आर्मीच्या पथकाने चोरट्यांचा सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे जळगाव बसस्थानकापर्यंत अंदाज घेतला. भजे गल्लीत दोघे शिरल्याचे देखील कॅमेऱ्यात कैद झाले होते. पथकाने पोलीस प्रशासनाच्या नेत्रम विभागाची मदत घेतली मात्र पुढे चोरट्यांचा शोध लागत नव्हता. हा प्रकार पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यापर्यंत पोहचतात. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना दिल्या.
हॉटेलचा कूक निघाला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक !
किसनराव नजन पाटील यांनी लागलीच पथकाला बॅगच्या शोधार्थ रवाना केले. दरम्यान, दोघे चोरटे हे भजे गल्लीत दारू पित असतांना ते आम्ही एका नामांकीत हॉटेलमध्ये कुक असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी संबंधित हॉटेलमध्ये जावून बॅग चोरणाऱ्या संशयिताला खाक्या दाखविताच त्याने चोरलेली बॅग काढून दिली.
बॅगेतील पैशातून रिचवली दारु एलसीबीच्या पथकासोबत आर्मी अधिकारी आणि टीम देखील होती. बॅगेत कागदपत्रे सुरक्षीत असल्याचे पाहून सुभेदारांच्या डोळ्यात अश्रू तरळले. बिहार येथे जाण्यासाठी उभे असताना संधी साधत एका वेटरने बॅग लंपास केली होती. बॅगेतील पैसे काढून घेत त्याने बॅग सागरपार्क जवळ नामांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कूक मित्राकडे दिली होती. बॅग घेवून पथक पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर सुभेदाराच्या आनंद गगनात मावेनासा झाला होता.
संपुर्ण कार्यालयात केले मिठाईचे वाटप !
आर्मी सुभेदार आणि पथकाने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्यासह संपूर्ण टीमचे आभार मानले. त्यांनी मिठाई आणून संपूर्ण कार्यालयात मिठाईचे वाटप केले. तीन दिवसानंतर आनंदाचे क्षण कैद करून टीम रात्री जेवणाचा आस्वाद घेत पुण्याच्या दिशेने रवाना झाली.
















