भुसावळ (प्रतिनिधी) लग्न समारंभात नातेवाईक असल्याचे भासवून वराडाचे दाग दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून १ लाख १४ हजार ४४६ रुपये किमतीची एक सोन्याची लगड, ५० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची मोटरसायकल, पाच हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण १ लाख ६९ हजार ४४६ रुपये हस्तगत करण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिक असे की, भुसावळ बाजारपेठ बाजारपेठ पोलीस ठाण्यात विनायक शिवाजी दराडे (वय ३०, रा. साईकिरण अपारर्मेन्ट, वायलेनगर खडकपाडा कल्याण [प] मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. विनायक शिवाजी दराडे हे दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी चिराग उमाकांत बोके यांचे भसावळ शहरात बालाजी लॉनमध्ये लग्न कार्याक्रमासाठी आले असता त्याचे रुम नं.०५ मध्ये त्याच्या पत्नीचे पर्स मधुन १ लाख १० हजार ७५४ रुपये व ३२ ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिणे व साक्षीदार हीचे ७ हजार रोख रक्कम असा एकुण १ लाख १७ हजार ७५४ रुपये असे एक अनोळखी पुरुष सुमारे ४० वर्ष वयाचा इसमांने फिर्यादीचा संमतीवाचुन चोरून नेला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याबाबत उपविभागिय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून यातील संशईत आरोपी राहुल वासुदेव भामरे (वय-३७ रा. प्लॉट नं. १४ बी, साईनगर जळगाव) यास दि. ७ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ११.३० वाजता भुसावळ शहरातुन वांजोळा रोड भागातुन ताब्यात घेण्यात आले होते. अटक आरोपी यांची पोलीस कस्टडी दरम्यान सखोली विचारपुस केली असता त्याने गुन्हे केल्याचे कबुली दिली असून त्याच्याकडून १ लाख १४ हजार ४४६ रुपये किमतीची एक सोन्याची लगड (रतनलाल सी बाफना ज्वेलर्स जळगाव दुकानातून), ५० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची मोटरसायकल, पाच हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण १ लाख ६९ हजार ४४६ रुपये हस्तगत करण्यात आले आहे. उपविभागिय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांचा मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा व उपविभागिय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, भुसावळ बाजारपेठ पोस्टे. प्रभारी पोलीस निरीक्षक गजाजन पडयण तसेच सहा पो निरी गणेश धुमाळ, पोहेकॉ सुनिल जोशी, पोना विकास सातदिवे, रमन सुरळकर, उमाकांत पाटील, निलेश चौधरी, पोका प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, प्रशांत सोनार, जिवन कापडे, योगेश माळी, परेश बि-हाडे, चालक पोना दिनेश कापडणे तसेच पोना दिपक पाटील यांनी केली आहे.
















