जळगाव (प्रतिनिधी) कोरोना टेस्ट निगेटिव्ह येताच बंगालच्या निवडणूक प्रचारासाठी माजी मंत्री गिरीश महाजन रवाना होत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांना पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात जायचे असल्याने त्यांनी मंगळवारी पुन्हा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना चाचणी केली. त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या निवडणूक रिंगणात प्रचारासाठी उतरण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आज सायंकाळी ते औरंगाबाद मार्गे विमानाने रवाना होणार आहेत.
कोरोनाची लागण होण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जोरदार टीका झाली होती. दोघा नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, दोघांनी एकमेकांच्या कोरोना लागण बाबत राजकीय टीका करून संशय व्यक्त केला होता. मंगळवारीच महाजन हे मुंबई येथे उपचार घेऊन जळगाव येथे आले. त्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली.
गिरीश महाजन यांना पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात जायचे असल्याने त्यांनी मंगळवारी पुन्हा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना चाचणी केली असल्याचे सांगण्यात आले. आज त्याचा अहवाल आला असून ती निगेटिव्ह आली आहे. या अहवालामुळे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ते आज औरंगाबाद मार्गे विमानाने रवाना होणार आहेत.
महापौरपदाच्या निवडणुकीच्या एक दिवस आधीच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात राहावे लागले. तेथून आल्यानंतर ते थेट आता बंगालच्या मोहिमेवर निघाले आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपच्या समोर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कडवे आव्हान आहे. त्यामुळे भाजपने देशभरातली नेत्यांना व कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पाचारण केले आहे. त्यामध्ये महाजनही प्रचारला जाणार आहे.
















