जळगाव (प्रतिनिधी) गावातील नातेवाईकांकडे जेवण करुन आल्यानंतर घराचा दरवाजा उघडताच गळफास घेतलेल्या अवस्थेत पती दिसताच पत्नीला जबर धक्का बसला. हिरामण मंगल शिंपी (वय ४३) रा. उधना, सुरत गुजरात ह.मु. जयभवानी नगर, मेहरूण, असे मयत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शहरातील मेहरुण परिसरातील जय भवानी नगरात दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास सुमारास घडली.
गुजरात येथील सुरत उधना येथील रहिवाशी असलेले हिरामण मंगल शिंपी हे आजारी असल्याने त्यांच्यावर औषधोपचार करण्यासाठी त्यांचा शालक पवन शिंपी हा त्यांना जळगावला घेवून आला होता. अस्पष्ट आहे. त्यामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ते शालकाच्या घरात वरच्या मजल्यावर पत्नी व दोन मुलींसह वास्तव्यास होते. त्याच परिसरात पवन शिंपी यांचे मामा राहत असल्याने त्यांच्याकडे सर्वांना जेवणासाठी गेले होते. त्याठिकाणाहून जेवण केल्यानंतर हिरामण शिंपी हे घरी निघून गेले आणि त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली.
कुटुंबियांकडून आक्रोश केला जात असल्याने परिसरातील नागरिकांनी पवन शिंपी यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांनी हिरामण शिंपी यांचा मृतदेह खाली उतरवून त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. पवन याने मामांकडे जेवण केल्यानंतर बहिणीला घरी सोडण्यासाठी आला. बहिण वरच्या मजल्यावर गेली. त्यांनी घराचा दरवाजा उघडताच तीला पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. ते बघून त्यांनी मनहेलावणारा आक्रोश केला. हिरामण शिंपी यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
















