जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत जिल्हा सरकारी वकील केतन ढाके हे ४७६ मते मिळवून अध्यक्षपदाच्या लढतीत विजयी झाले. उपाध्यक्ष म्हणून मतदारांनी वैशाली महाजन यांना निवडून दिले. त्यांना ५९२ मते मिळाली.
मतदान प्रक्रीया शुक्रावरी पार पडली होती. त्यात १ हजार ४० पैकी ९०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यानंतर शनिवारी दिवसभर मतमोजणी सुरू होती. या निवडणूक प्रक्रीयेसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. दिलीप मंडोरे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. संग्राम चव्हाण, योगेश महाजन, हेमंत भंगाळे, कालिंदी चौधरी यांनी काम पाहिले. अध्यक्षपदासाठी अॅड. ढाके यांच्यासह किशोर भारंबे, सागर चित्रे व स्वाती निकम असे चौघे रिंगणात होते. त्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत अॅड. केतन ढाके यांनी बाजी मारली.
विजयी उमेदवार व मते
अध्यक्ष : केतन ढाके (४७६), उपाध्यक्षा : वैशाली महाजन (५९२), सचिव : स्वप्निल पाटील (३५४), सहसचिव : देवता पाटील (४०१), कोषाध्यक्ष : विशाल घोडेस्वार (३३३), सदस्य : अॅड. निखील पाटील (६३९), दीपक वाघ (६०४), हर्षल देशमुख (५९६), खुशाल जाधव (५९३), अजय पाटील (५९०), नीलेश जाधव (५७७), हेमंत गिरनारे (५५०), विवेक पाटील (५२२), दीपाली भावसार (५८०), शितल राठी (३५३)