जळगाव (प्रतिनिधी) वर्षभरापासून कोरोना या महामारीतून उद्भवलेल्या व्यावसायिक आणि व्यावहारिक जगणं प्रचंड विस्कळीत झालं. अनेक कुटुंबातील आधार कोरोनामुळे गेले. आर्थिक समस्या विकोपाला गेल्या परिणामी अनेकांचे रोजगार गेले. काही कुटुंब अजूनही या बिकट परिस्थितीतून पुरेसे सावरलेले नाहीत. कोविडच्या आपत्तीमुळे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
उद्या दिनांक १० फेब्रुवारी रोजी जैन उद्योग मूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचा वाढदिवस आहे. दरवर्षी त्यांना स्नेही जन मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी जैन हिल्सवर येत असतात. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात येते. तथापि, यंदा त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रात म्हटले आहे की, वाढदिवसाला येणाऱ्या स्नेहीजनांच्या गोतावळ्यात रमणे हे सुखकारक असते. यंदा कोरोनाचे संकट असून अजूनही हे सावट दूर झालेले नाही. यामुळे या वर्षाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. अर्थात, यासाठी कुणी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा देऊ नये असे यात सुचविण्यात आले आहे. तर आपण दूरध्वनी, भ्रमणध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा स्वीकारणार आहेत. प्रत्यक्ष भेटीविना मला प्राप्त झालेल्या शुभेच्छा सर्वांच्या आरोग्याची दक्षता घेऊन दिलेल्या असल्यामुळे आनंददायीसुद्धा असतील. आपण माझ्या भावनांचा मनापासून स्वीकार आणि आदर करणार आहात याबाबत मला संदेह नाही, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.