TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लवकरच पद्मालय देवस्थानाला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्याची ग्वाही : ना.गुलाबराव पाटील

पद्मालय ते गालापूर येथील पाणी पुरवठा योजनेचे गुलाबभाऊंच्या हस्ते भूमिपुजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2022
in एरंडोल, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) : पाणी पुरवठा खात्यातर्फे राज्यातील २२ हजार योजनांना मंजुरीचा विक्रम आपल्या खात्याच्या माध्यमातून झाला असून याद्वारे अगदी लहान गावे आणि वाडी-वस्त्यांपर्यंत पिण्याचे शुध्द पाणी पुरवठा करण्याला वेग आलेला आहे. या अनुषंगाने गालापूर – मूकपाट ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन करण्यात आले असून याच्या मदतीने ग्रामस्थांची तहान भागणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते मुकपाट (पद्मालय) येथे पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपुजनानंतर बोलत होते. तर याच परिसरातील ख्यातनाम असणार्‍या पद्मालय देवस्थानाला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देणार असून याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

एरंडोल तालुक्यातील गालापूर – मूकपाट ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आज मुकपाट येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते तथा आमदार चिमणराव पाटील होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेतकी संघाचे माजी अध्यक्ष पोपटराव चव्हाण, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, वरखेडीचे सरपंच संतोष पाटील, पिंप्रीचे बबन पाटील; आनंदनगरचे गजानन राठोड, मालखेडेचे माजी सरपंच मुकुंदा पाटील, टोळी येथील सरपंच बाळा पाटील, पांडुरंग पाटील, विजय माळी, अशोक पाटील, ठेकेदार शांताराम पाटील, ताडे येथील सरपंच सचिन पाटील, जावेद मुजावर, चंद्रभान पाटील, बबलू पाटील, संगायोचे शरद ठाकूर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

READ ALSO

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

प्रास्ताविक गालापूर येथील आरीफ शेख यांनी केले. त्यांनी गावासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले. आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात विविध विकासकामांना गती आली असल्याचे सांगितले.

अशी आहे पाणी पुरवठा योजना

गालापूर-मूकपाट ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत फुलपाट येथे ६० लक्ष रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. यात मुखपाट तलावाच्या शेजारी पाण्याचा मुख्य स्त्रोत असणारी विहिर तयार करण्यात आलेली आहे. येथून सुमारे दीड किलोमीटरच्या पाईपलाईनद्वारे पाणी गावातील ४० हजार लीटर क्षमतेच्या जलकुंभात आणले जाणार असून ते ग्रामस्थांना थेट आपल्या नळातून मिळणार आहे.

ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यभरात सर्वच ठिकाणी पाणी पुरवठा योजनांना गती मिळाली असल्याचे नमूद केले. यात नवीन निकषांच्या माध्यमातून वाढीव पाणी मिळणार आहे. पाणी पुरवठा खात्याच्या तत्पर कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले असून भविष्यात देखील याच प्रकारे गतीमान कामे होत राहतील अशी ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

दरम्यान, हा कार्यक्रमा आधी ना. गुलाबराव पाटील यांनी उपस्थित मान्यवरांसह पद्मालय येथील श्रीगणेशाचे दर्शन घेतले. या ठिकाणी देवस्थानाचे विश्‍वस्त, पुजारी आणि भाविकांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी झालेल्या अनौपचारीक चर्चेत ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, पद्मालय देवस्थानाला ‘ब’ वर्गाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी आपण आधीच शासन दरबारी प्रस्ताव पाठविलेला असून याचा पाठपुरावा सुरू आहे. हा दर्जा लवकरच मिळणार आहे. तर, देवस्थानाच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र ग्रामविकास अथवा पर्यटन यातून किमान पाच कोटी रूपयांचा निधी मिळवून देण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे आश्‍वासन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक रमेश पवार यांनी केले. तर गालापूरचे सरपंच विनोद महाजन यांनी आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी 2026 !

February 15, 2026
Next Post

बोदवड शहरात मूल पळवणारी महिला पकडल्याची अफवेवर जनतेनं विश्वास ठेऊ नये : पो.नि. राजेंद्र गुंजाळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरातील कुख्यात गुन्हेगार रफिक उर्फ काजल शेख स्थानबद्ध !

May 23, 2023

खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता ; ईडीचे आठवडाभरात आरोपपत्र !

August 29, 2021

बंद असलेल्या डॉक्टरच्या घरात चोरट्यांची हातसफाई

October 17, 2025

काय सांगता? : कोरोना लस घेतल्यानंतर अपघातात वाचा गेलेला माणूस बोलू लागला !

January 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group