नागपूर (वृत्तसंस्था) सेंट्रल एव्हेन्यूवरील एका खासगी रुग्णालयातील ३९ वर्षीय डॉक्टरने आपलं जीवन संपवलं (Doctor’s ends life) आहे. स्वतःला भुलीच्या इंजेक्शन टोचून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे शहरातील वैद्यकीय वतुर्ळात प्रचंड खळबळ उडाली आहे. डॉ. अभिजीत रत्नाकर धामनकर (Abhijeet Dhamankar) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.
डॉ. अभिजीत रत्नाकर धामणकर असं आत्महत्या करणाऱ्या ३९ वर्षीय डॉक्टरचं नाव आहे. ते नागपूर शहरातील राऊत चौक परिसरातील लालगंजमध्ये राहत होते. ते सध्या सेंट्रल एव्हेन्यूवरील किमया हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. मृत अभिजीत यांची दोन लग्न झाली होती. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर २०१७ साली त्यांनी दुसरा विवाह केला होता. त्यांना एक वर्षाचा मुलगा देखील होता. पण सासरच्या मंडळींकडून त्यांच्या संसारात सतत ढवळाढवळ केली जात होती. त्यामुळे घरातील वातावरण बिघडलं होतं.
त्यानंतर झालेल्या घरगुती वादातून पत्नीही माहेरी निघून गेली होती. त्यामुळे मृत अभिजीत मागील काही काळापासून अवस्थ झाले होते. अशात गुरुवारी त्यांची रात्रपाळी होती. रात्री दहाच्या सुमारास ते नेहमी प्रमाणे रुग्णालयात आले होते. रात्री उशिरा त्यांनी रुग्णांची तपासणी करून आपल्या खोलीत आराम करण्यासाठी गेले होते. दरम्यान पहाटे तीनच्या सुमारास रुग्णालयातील एका रुग्णाची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे एक नर्स डॉ. अभिजीत यांना बोलवायला गेली.
पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांची नाडी आणि श्वासोच्छवास बंद पडल्याचं आढळलं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नर्सने तातडीने वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली आणि डॉ. अभिजीत यांना व्हेंटिलेटरवर ठेवून कृत्रीम श्वास देण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. पहाटे पाचच्या सुमारास सहकारी डॉक्टरांनी अभिजीत यांना मृत घोषित केलं आणि घटनेच्या माहितीच्या त्यांच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली असता, त्यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली आहे. त्यामध्ये त्यांनी मृत्यूचं कारण लिहिलं आहे. सीमा गायकवाड, विनय गायकवाड, राहुल लोखंडे आणि तांबेबाई यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाईट नोटमध्ये नमूद केलं आहे.