जळगाव (प्रतिनिधी) श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालय न्यू पनवेल (स्वायत्त) आयोजित अटल करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी जल्लोषात संपन्न झाली.
समर्थ कला बहुउद्देशीय संस्था जळगाव यांनी अटल करंडक स्पर्धेची प्राथमिक फेरी घेऊन स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. प्रसिद्ध दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांच्या हस्ते नटराज पूजन करून व नारळ फोडून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
या एकांकिकेने प्रथम सेल नसलेला रेडिओ नूतन मराठा कॉलेज यांनी द्वितीय सुसाईड यांनी उत्तेजनार्थ प्रथम उंच माझा झोका गं! यांनी उत्तेजनार्थ द्वितीय कात अशी सांघिक रोख रकमेची बक्षिसे पटकावली.
दिग्दर्शक प्रथम हनुमान सुरवसे- सेल नसलेला रेडिओ दिग्दर्शन, द्वितीय किरणकुमार अडकमोल -सुसाईड, लेखन, प्रथम आरती गोळीवाले- सुसाईड, लेखन द्वितीय अभिजित कबाडे – कात
पार्श्वसंगीत प्रथम रितेश वानखेडे- उधी, पार्श्वसंगीत द्वितीय स्वप्नील लहासे- फटका , पुरुष अभिनय प्रथम रोहन देविदास काटे- सेल नसलेला रेडिओ, पुरुष अभिनय द्वितीय सुजय भालेराव- कात, स्त्री अभिनय प्रथम आरती गोळीवाले – सुसाईड, स्त्री अभिनय द्वितीय नेहा वंदना सुनील- तुकडा यांनी बक्षीस पटकावले.
स्पर्धेचे परीक्षक प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते अभिजीत झुंजारराव व प्रसिद्ध अभिनेते प्रमोद शेलार यांनी केले. अटल करण करंडकाच्या कार्यकारणी सदस्य अभिषेक पटवर्धन गणेश जगताप अमोल खेर यांनी कामकाज पाहिले बक्षीस वितरण समारंभात परीक्षकांच्या वतीने अभिजीत झुंजारराव यांनी नाटकाची पद्धत मांडणी लेखन व अभिनयातील बारकावे यावर मार्गदर्शन केले तर ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे यांनी नवीन कलावंत आणि जास्तीत जास्त प्रमाणात नाट्य क्षेत्रात यावे असे आवाहन केले.
याप्रसंगी रंगमंचावर श्री स्वामी समर्थ ग्रुपच्या संचालिका प्रतीक्षा पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी प्राध्यापक राजेंद्र देशमुख, समर्थ कला बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश जाधव, स्पर्धा समन्वयक विशाल जाधव, अटल करंडक कार्यकारणी सदस्य अभिलेख पटवर्धन, गणेश जगताप, अमोल खेर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावेश पाटील तर आभार प्रदर्शन योगेश लांबोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सागर सदावर्ते, महेश कोळी, पियुष पाटील, विशाखा सपकाळे, चंद्रपाल सुरवाडे, कृष्णा बारी, तेजस कोठावदे इ. यांनी परिश्रम घेतले.